शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये शिवजयंतीनिमित्त मशाल मिरवणूक

By admin | Updated: February 20, 2017 06:23 IST

तालुक्यात अनेक गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त मशाल मिरवणुका, शिवचरित्रावरील व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात

कर्जत : तालुक्यात अनेक गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त मशाल मिरवणुका, शिवचरित्रावरील व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शिवजयंतीनिमित्त शिवराज प्रतिष्ठानच्या विकी गुरव, अक्षय सोनावळे, सूरज हडप, सागर गंगावणे, नीलेश मुने, प्रतीक ठाकरे आदी सदस्यांनी माथेरानजवळील पेप किल्ल्यावरून मशाल आणली. तत्पूर्वी शिवराज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण केले. संचिता कडू आणि स्वप्नाली पाटील यांनी परिसरात रंगावल्या साकारून सुशोभीकरण केले होते. प्रतिष्ठानच्या महिला विभाग अध्यक्षा पद्मिनी गुरव यांच्यात हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शंकर ठोंबरे यांच्यात हस्ते शिवरायांचे पूजन केले. शिवरायांची आरती करून त्यांच्या नावाचा जयघोष केला.कोठिंबे येथील खांबलिंगेश्वरच्या सदस्यांनी राजमाची किल्ल्यावरु न विक्र ांत कर्वे, अनंत गायकवाड, मंगेश पवार, आदित्य गायकवाड, मिलिंद डामसे, संतोष मोरे, नरेश मोरे, जयेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल दौड करून कर्जतच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आणून मिरवणुकीने कोठिंब्यापर्यंत नेली. (वार्ताहर) महाडमध्ये विविध कार्यक्रममहाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष स्रेहल जगताप यांच्या हस्ते छ. शिवरायांच्या शिवाजी चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावर्षी सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप तसेच महाडकर नागरिक मोठ्या संस्थेने उपस्थित होते. महाड नगरपरिषदेतही यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन के ले होते.जनता विद्यालयात शिवजयंती साजरीरसायनी : जनता विद्यालय व ज्यु. कॉलेज मोहोपाडा (ता. खालापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८७ वी जयंती (शासकीय) लेझीम पथकाच्या रॅलीने साजरी झाली.च्ग्राम सुधार मंडळाचे सचिव तात्यासाहेब म्हसकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी मराठी व इंग्रजी माध्यम विद्यालयाचे प्राचार्य अनुक्र मे डी. सी. सुपेकर, बी. एस. वारे आदी उपस्थित होते. माथेरानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरीमाथेरान : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय शिवजयंती नगर परिषदेच्या माध्यमातून येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी अकरा वाजता नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष कक्षात छत्रपतींच्या प्रतिमेला विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पांडे रोड येथे छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला स्थानिक कार्यकर्ते राजू कदम, रवींद्र परब यांच्या हस्ते पुष्पहार, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला ज्ञानेश्वर बागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला माजी नगरसेवक कुलदीप जाधव, हेमंत बिरामणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत, संदीप कदम, राकेश चौधरी,चंद्रकांत जाधव, नगरसेविका सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, ज्योती सोनावळे, कीर्ती मोरे आदींसह नागरिक उपस्थित होते.