अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत नाईक यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेकाप-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला असताना दुसरीकडे शिवसेना, भाजपा यांच्यासह अन्य पक्षाच्या महाआघाडीला अद्याप उमेदवार पक्के करता आले नसल्याचे चित्र आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याआधी सर्व उमेदवार शेतकरी भवनमध्ये जमा झाले होते. त्यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी उमेदवारांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी पक्षाने शेकापला साथ दिली आहे. अलिबाग नगरपालिका निवडणुकीत आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन आ. पाटील यांनी केले. शुक्र वारी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये प्रभाग क्र . १ अ -अनुसूचित जमाती महिला जागेसाठी सुषमा पाटील, १ ब-सर्वसाधारण जागेसाठी राकेश चौलकर, प्रभाग क्र . ३ अ-गौतम पाटील व साक्षी पाटील यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी, ३ ब- सर्वसाधारण महिला जागेसाठी अश्विनी पाटील, प्रभाग क्र . ४ अ- ना.म.प्र. जागेसाठी प्रदीप नाईक, ४ ब- सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रिया घरत, प्रभाग क्र . ५ अ-अनुसूचित जाती विनोद दिनकर सुर्वे,५ ब- सर्वसाधारण महिला जागेसाठी संजना कीर, प्रभाग क्र . ६ अ- ना.म. प्र. महिला जागेसाठी मानसी म्हात्रे, ६ ब- सर्वसाधारण जागेसाठी उमेश पवार, प्रभाग क्र . ८ अ- अनुसूचित जमाती राखीव जागेसाठी शैला शेषनाथ भगत, ८ ब- ना.म.प्र. महिला जागेसाठी राजश्री पांडुरंग पेरेकर, ८ क- सर्वसाधारण महिला जागेसाठी नईमा अफजल सैयद या शेकाप - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अलिबाग नगरपरिषदेच्या प्रभाग क्र मांक २ व ७ येथील ४ जागांसाठीचे उमेदवारी अर्ज २९ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रभाग क्र . २ अ- ना.म.प्र. महिला जागेसाठी वृषाली राजन ठोसर, २ ब- सर्वसाधारण जागेसाठी अजय श्रीराम झुंजारराव तर प्रभाग क्र . ७ अ- सर्वसाधारण महिला जागेसाठी सुरक्षा जगदीश शहा, ७ ब- सर्वसाधारण जागेसाठी अनिल रमेश चोपडा हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आघाडीच्या सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
आघाडीच्या १४ उमेदवारांचे अर्ज
By admin | Updated: October 29, 2016 04:03 IST