शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

आजचे तरु ण क्रांतिकारक बदल घडवू शकतात -कोळंबे

By admin | Updated: January 12, 2017 06:09 IST

युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही

कर्जत : युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही त्यांना आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. प्रचंड प्रमाणात डोनेशन घेतले जाते. दीडशे वर्षांपूर्वी या देशात वेगळी परिस्थिती होती. एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता; परंतु ही परिस्थिती उलथून टाकण्याचे काम महापुरुषांनी केले. छत्रपती शिवरायांनी १७व्या शतकात तरु ण वयातच तोरणा किल्ला उभारून रयतेच्या राज्याचे तोरण उभे केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३मध्ये तरु णपणातच उच्च शिक्षांच्या पदव्या मिळविल्या आणि वयाच्या३०व्या वर्षी भाई कोतवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपल्या जडणघडणीमध्ये या महापुरु षांचा मोठा त्याग आहे. आजचा तरु ण या देशात क्र ांतिकारी बदल घडवून आणू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती कमजोर आहे किंवा मी ग्रामीण भागातील आहे, ही भावना दूर करून महापुरु षांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे रायगडभूषण वसंत कोळंबे म्हणाले.लाइट आॅफ लाइफ ट्रस्ट ही सामाजिक संस्थेच्या वतीने ‘युवा महोत्सव’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र माचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते. त्यावेळी कोळंबे बोलत होते.‘मी घडलो, आता मी घडवेन’ हा संदेश घेऊन संस्थेच्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, या महोत्सवाचे उद्घाटन वसंत कोळंबे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये युवकांना भारतीय उच्च शिक्षणाची आव्हाने आणि त्याचे देशाच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर होणारे परिणाम या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांनी सामाजिक विषयावर नाटक, समूह नृत्य, मूक अभिनय सादर केले. या वेळी नाना नानी फाउंडेशन संस्थापक सिंघानिया, प्रदीप रॉय, संस्थेच्या कमल दमानिया, सुधीरकुमार गजभिये, श्रुती मालगुंडकर, मकरंद पाठक, कांचन थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प समन्वयक पंकज कांबळे यांनी केले. (वार्ताहर)