शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणार; आ. जयंत पाटील यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 20:22 IST

नारंगी ग्रामपंचायतीच्या वास्तुचे उद्घाटन, आस विद्यालय अ‍ॅपचा शुभारंभ

अलिबाग - आगरी समाज आणि रायगडचा शैक्षणिक विकास ना.ना.पाटील यांनी केला आहे. तीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. त्याच दृष्टीकोनातून खारेपाटात चांगल्या दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करायच्या आहेत असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. खारेपाटातील नारंगी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वास्तूचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा गटनेते अ‍ॅड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरहरी म्हात्रे, तसेच पत्रकार रिद्धी प्रसाद म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आ. जयंत पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, खारेपाटाचा एक वेगळा इतिहास आहे. सदैव स्फुर्ती देणारा असा हा खारेपाट आहे. आगरी समाज आहे त्या ठिकाणी विकासाचे वेगळे चित्र दिसते. रायगडच्या आगरी समाजाची इंगजांमध्ये देखील दहशत होती. म्हणूनच इंग्रज रायगडकडे फिरकले देखील नाहीत. या समाजाकडे बुद्धीमत्ता आहे, आक्रमकता आहे. नारंगी ग्रामपंचायतीच्या टिमचे काम उत्कृष्ट चालले असून. मला अभिप्रेत असणारे काम होत असल्याने समाधान वाटते. त्यामुळे मी नारंगीसाठी दुप्पट निधी देईन अशी ग्वाही त्यांनी दिली.

तसेच नारंगी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचे खरे श्रेय हे दातार काकांचे आहे. काम करणार्‍यांकडून चुका होतात. पण प्रामाणिकपणा ठेवला तर त्याला वेगळी धार येते. खारेपाटातील नाट्य संस्कृती टिकवली पाहिजे. भजन स्पर्धांचे आयोजन करुन ग्रामीण भागातील नाट्य संस्कृती शहरात गेली पाहिजे अशी अपेक्षाही जयंत पाटलांनी व्यक्त केली. मते येतात जातात पण आपण केलेले काम कायम राहते. गेल्या काही वर्षात शेकाप पक्षाने अलिबाग तालुक्यात प्रचंड काम केले आहे. त्यामुळे आता काम केले नाही तरी शेकापक्षाचाच आमदार येईल अशी परिस्थिती असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.