शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा उद्योग, पर्यावरण -हास रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:43 IST

प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही.

- आविष्कार देसाई ।अलिबाग : प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही. आपत्ती, भूकंप, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखी अशा विविध माध्यमांतून तो मानवाला त्याची परतफेड करत असतो, हे रोखायचे कसे? या विचारात असतानाच एका मैत्रिणीने कापडी पिशव्या माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि बस्स... उपाय सुचला, असे फॅशन डिझायनर असलेल्या अलिबागमधील प्रार्थना नागवेकर यांनी सांगितले.ड्रेस डिझायनिंगचा व्यवसाय करायचा सोडून कापडी पिशव्या बनवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. प्लास्टिकला रोखायचे असेल, तर त्याला कापडी पिशवी हाच पर्याय असल्याचे त्यांना उमगले. त्यांनी प्रार्थना जेएलजी या नावाने महिलांचा बचतगट स्थापन केला.अलिबाग येथे त्यांनी सुरू केलेल्या छोटेखानी कारखान्यामध्ये १४ महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्या महिलांना स्वाभिमानाने जगण्याला व्यासपीठ दिले आहे. स्वत:चा कोणताच आर्थिक स्रोत नसणाºया या महिला आता महिन्याला पाच हजार रुपये कमवतात. ड्रेस डिझायनर म्हणून त्यांना या क्षेत्रामध्ये बक्कळ पैसा कमावता आला असता. मात्र, पैसा हे एकच ध्येय न ठेवता राष्ट्रहितासाठी प्लास्टिकला हद्दपार करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखणण्या सारखाच असल्याचे दिसून येते.प्रार्थना यांची मैत्रीण अर्पणा पाटील यांनी त्यांच्यासमोर अचानकपणे एके दिवशी कापडी पिशव्या समोर ठेवल्या. त्यानंतर त्यांनी या माध्यमातूनच प्लास्टिकला पर्याय देण्याची तयारी सुरू केली. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते निर्सगाला आणि पर्यायाने मानवालाही घातक आहे. आपल्या लहानपणी दळण आणण्यासाठी आई कापडी पिशवीच देत होती. त्या वेळी सर्रासपणे आपण कापडी पिशव्यांचाच वापर करायचो, असे प्रार्थना यांनी सांगितले.विविध आकाराच्या, रंगाच्या, चैन लावलेल्या, हॅण्डल असलेल्या कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला. दीड रुपयांपासून ते साडेचार रुपयांपर्यंत पिशव्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याला पाच हजार पिशव्या बनवल्या जातात; परंतु हा आकडा ज्या वेगाने मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या येतात त्यापेक्षा किती, तरी कमी आहे. जनजागृतीच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर निश्चितच कमी करता येण्यासारखा असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रहितासाठी प्लास्टिक वापरणार नाही, याची खुणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधल्यास निसर्गाच्या प्रकोपापासून आपण वाचू शकतो.

टॅग्स :Raigadरायगड