शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमधील भोस्ते येथील तिघांची कोरोनावर यशस्वी मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:36 IST

वरळी येथून ५ एप्रिलला श्रीवर्धन भोस्ते येथे पोहोचलेल्या कुटुंबातील पाचही व्यक्ती प्रथम चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.

श्रीवर्धन : दक्षिण रायगडमध्ये हाहाकार उडवणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते स्वगृही परतले आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमधील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.वरळी येथून ५ एप्रिलला श्रीवर्धन भोस्ते येथे पोहोचलेल्या कुटुंबातील पाचही व्यक्ती प्रथम चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. त्यानुसार पनवेल येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर २६ एप्रिलला दुसºया कोरोना चाचणीत कुटुंबातील तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. या तिघांना स्वगृही पाठवण्यात आले असून पुढील काळजी घेण्यासाठी त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.उर्वरित दोन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती रायगड जिल्हा माहिती कक्षाद्वारे प्राप्त झाली आहे. श्रीवर्धनमधील ४८ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी १२९ व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.तीन रुग्णांच्या निगेटिव्ह अहवालामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे . मात्र श्रीवर्धन तालुका प्रशासनाने खबरदारी घेत जसवली, भोस्ते व श्रीवर्धन शहर ही गावे पूर्णपणे बंदिस्त केली आहेत. श्रीवर्धन तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीव्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार बंद आहेत.>प्रशासन सजग आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या अडीअडचणीत सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. जनतेने नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे.- अमित शेडगे,प्रांताधिकारी, श्रीवर्धन>श्रीवर्धनमधील ४८ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्या पॉझिटिव्हपैकी तीन व्यक्ती पूर्णपणे ठणठणीत बºया होऊन स्वगृही पाठवल्या आहेत. इतर दोघांचीही प्रकृ ती चांगली आहे . - मनोज सानप,माहिती अधिकारी, रायगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या