शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू, कर्जतजवळ कार व रिक्षाची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 06:56 IST

कर्जत-कल्याण रस्त्यावरील डिकसळ गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला.

कर्जत : कर्जत-कल्याण रस्त्यावरील डिकसळ गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक कार व रिक्षाची धडक झाली. यात कार आणि रिक्षा जळाली. यामुळे रिक्षातील तीन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जोराच्या धडकेने रिक्षातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्गावर डिकसळमधील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. नेरळकडून कर्जतकडे जाणाऱ्या रिक्षाला मागून येणाऱ्या कारने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही गाड्यांना आग लागली. रिक्षातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला असावा, असे काहींचे म्हणणे आहे. स्थानिकांनी याची पोलीस व कर्जत अग्निशमन दलाला माहिती दिली. सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत दोन्ही गाड्या आगीत भस्मसात झाल्या होत्या. अपघातानंतर कारमधील प्रवासी खाली उतरल्याने ते बचावले. तर रिक्षातील सरिता मोहन साळुंके (रा. नेरळ), सुभाष जाधव व शुभांगी सुभाष जाधव (रा. बदलापूर) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातKarjatकर्जत