शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे वर्षांची परंपरा आजही आबाधित; सोने लुटण्याची आंग्रेकालीन परपंरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:19 IST

सरखेल कान्होजीराजे आंगे्र यांनी सुरू केलेली विजया दशमी अर्थात दसºयाच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची परंपरा त्यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी आजही आबाधित राखली आहे.

अलिबाग : सरखेल कान्होजीराजे आंगे्र यांनी सुरू केलेली विजया दशमी अर्थात दसºयाच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची परंपरा त्यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी आजही आबाधित राखली आहे.दसºयांच्या दिवशी त्या काळात सोने लुटण्याच्या सोहळ््यास मोठे महत्त्व होते. पावसाळी हंगामातील भात पिके तयार होण्याच्या बेतात असत. शेतीची कामे आटोपलेली असत आणि त्यामुळे या दिवशी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे, सोन्यांची अर्थात आपट्याच्या पानांची विधिवत भवानीच्या मंदिरात पूजा करावी आणि मग सोने लुटून एकमेकांना देऊन, एकमेकांना अलिंगन देऊन स्नेहाचे नाते दृढ करावे, अशी भावना या सोने लुटण्याच्या सोहळ््यामागची असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.शनिवारी रघुजीराजे आंग्रे यांच्या घेरीया या निवासस्थानी एकत्र आलेल्या समाज बांधवांनी एकत्रितरीत्या तेथून प्रस्थान करून, ऐतिहासिक हिराकोट किल्ल्या शेजारून हिराकोट तलावाजवळील श्री राजराजेश्वरी देवी मंदिरात पोहोचून सीमाल्ेलंघन केले.श्री राजराजेश्वरी देवी मंदिरात परंपरेनुसार सोन्याच्या अर्थात आपट्याच्या पानांचे विधिवत पूजन आणि देवीची आरती करून मंदिरात सोने लुटण्यात आले. तर मंदिरातून घेरीया येथे आल्यावर तेथेही सोने लुटण्याचा सोहळा झाला. उपस्थित समाज बांधवांनी एकमेकाला अलिंगन, आपट्याची पाने देऊन दसºयाच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Dasaraदसरा