शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये पावसाचा तीन दिवसांचा रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:36 IST

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

अलिबाग : मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्यांचा वारा असा मान्सूनचा झंझावात १४ ते १६ जुलैपर्यंत तीन दिवस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी५ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, काळ, भोगावती, उल्हास, गाढी या नद्यांच्या पातळीत वाढ झालेली नव्हती, त्यामुळे धोकादायक स्थिती उशिरापर्यंत नव्हती. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २८.०५ मिमी पाऊस झाला, तसेच १ जूनपासून मंगळवार अखेर एकूण सरासरी ११३८.४५ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड