शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

खिळखिळ्या पुलांवर अजूनही दिला जातोय लाखो वाहनांचा भार!

By admin | Updated: August 4, 2016 01:23 IST

मुंबई-गोवा महामार्ग : स्वातंत्र्यापूर्वीची ब्रिटिश शासनाची भेट भारत सरकारने जपली ‘जीवापाड’

विहार तेंडुलकर-- रत्नागिरी --महाडनजीक झालेल्या मुंबई - गोवा महामार्गावरील दुर्घटनेनंतर आता ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न पुढे आला आहे. या पुलांची मुदत संपली असल्याबाबत ब्रिटिश शासनाकडून वारंवार ‘रिमार्इंडर’ येत असतानाही शासनाने त्याकडे कानाडोळा केल्याने ही स्थिती उद्भवली आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. या रुंद-अरूंद पुलावरून अद्याप वाहतूक सुरुच आहे. याबाबत शासन गंभीर कधी होणार? असा प्रश्न आता केला जात आहे.महाडनजीक सावित्री नदीवरील पूल अचानक कोसळल्याने दोन बसेस वाहून गेल्या. त्याबरोबरच अन्य वाहनेही बेपत्ता झाली आहेत. जो पूल कोसळला, त्या पुलाचे मे महिन्यातच परीक्षण करण्यात आले होते आणि तो पूल वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचा अहवाल शासनाला देण्यात आला होता. पूल सुस्थितीत असताना तो कोसळला कसा? यावरून आता वादंग सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलांची ‘सुस्थिती’ही चव्हाट्यावर आली आहे.मुंबई-गोवा महामार्ग हा वर्दळीचा आणि सर्वांत महत्त्वाचा महामार्ग असतानाही आतापर्यंत सत्तेवर असलेल्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी या महामार्गाकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे महामार्ग अक्षरश: खिळखिळा झाला आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा विषयही गेली वीस वर्षे चर्चेत आहे. आजही तो प्रश्न मिटलेला नाही. त्यातच गेल्या काही वर्षात महामार्गावर अवजड वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. लहान वाहनांची संख्याही वाढल्याने महामार्ग कायम ‘बिझी’ असतो. ब्रिटिश सरकारने उभारलेले हे पूल इतक्या वर्षांनंतरही सेवा बजावताना दिसत आहेत. मात्र, ब्रिटिशांनी हे पूल उभारताना त्यावेळच्या वाहतुकीचा अंदाज घेऊन ते उभारले आहेत. हे सर्व पूल पूर्वी १० टनी वाहतुकीसाठीच बांधण्यात आले होते. परंतु, आजची स्थिती पाहता मिनिटाला ४० ते ५५ छोटी मोठी वाहने तसेच आधुनिक व शक्तिशाली कंटेनर या पुलावरून जात आहेत. त्यातील अनेक पूल कमकुवत आहेतच; शिवाय अरूंदही आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे आणि त्याबरोबरच वाहतूककोंडीचे प्रकारही होत आहेत. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.केंद्रातील रस्ते आणि वाहतूक खाते नितीन गडकरी यांच्याकडे आल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचा मुद्दा वेगाने पुढे सरकला आणि अनेक पुलांची कामे पूर्णत्त्वाकडे गेली. मात्र, त्या पुलांना जोडरस्ता अजूनही नसल्याने ते विनावापरच पडून आहेत. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण झाल्यानंतरच पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.सद्यस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ पूल आहेत. हे पूल लांबीने जास्त आहेत. मात्र, अरूंद आहेत. त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. काही पुलांचे रेलिंग तुटले आहेत, तर काहींचे पिलर सुटत चालले आहेत. या स्थितीतही या पुलांवरुन अवजड वाहतूक सुरु आहे. सर्व पूल सुस्थितीतरत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील या पुलांचे आताचे वय हे कमीत कमी ४८ वर्षे आणि जास्तीत जास्त २०० वर्षे एवढे आहे. खारेपाटणचा पूल हा १७४६चा आहे आणि या सर्व पुलांचा शासनदरबारी ‘पूल सुस्थितीत’ असा रिपोर्ट आहे, हे विशेष!ब्रिटिशांनाच काळजी!पुलांविषयी ब्रिटिश शासनाने भारत सरकारशी पत्रव्यवहार केला आणि या पुलांवरून वाहतूक करू नये, अशी विनंती केली. वाशिष्ठी नदीवरील पुलाबाबत ब्रिटिश शासनाने कळवले होते. या कोणत्याच पत्राची भारत सरकारने दखल घेतलेली नाही.चर्चा होते अन्...!महामार्ग आणि पुलामुळे झालेला अपघात या काही आजच्या घटना नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीवरील अरुंद पुलावरून १९ मार्चला पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास महाकाली ट्रॅव्हल्सची बस कोसळून ३७ जण ठार, तर १५ जखमी झाले होते. त्यानंतर ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावर विधानसभेत चर्चाही झाली आणि हवेतच विरली.रत्नागिरी - जगबुडी, ता. खेड (१९३१), वाशिष्ठी, ता. चिपळूण (१९४३), वाशिष्ठी नदीवरील दुसरा पूल (१९४३), गडनदी आरवली पूल, ता. संगमेश्वर (१९३२), शास्त्री पूल, ता. संगमेश्वर (१९३९), सोनवी पूल, ता. संगमेश्वर (१९३९), सप्तलिंगी पूल, ता. संगमेश्वर (१९७९), बावनदी, ता. संगमेश्वर (१९२५), काजळी नदी आंजणारी पूल, ता. लांजा (१९३१), मुचकुंदीवरील वाकेड पूल, ता. लांजा (१९३१), अर्जुना नदीवरील पूल, ता. राजापूर (१९४४).सिंधुदुर्ग - खारेपाटण पूल (१७४६-४७), पियाळी नदीवरील पूल, ता. कणकवली (१९४१), वेळणा नदी, ता. कणकवली (१९६१), जानवली पूल, ता. कणकवली (१९३४), गडनदी, ता. कणकवली (१९३४), कसाल नदीवरील पूल, ता. कुडाळ (१९३४), पिठढवळ नदीवरील पूल, ता. कुडाळ (१९५७), वेताळ बांबर्डे पूल, ता. कुडाळ (१९३८), भंगसाळ पूल, ता. कुडाळ (१९६८), बांदा पूल, ता. सावंतवाडी (१९५८).अपघातांची मालिकामुंबई - गोवा महामार्ग हा महाराष्ट्रात ६0९ एवढ्या किमीचा आहे. या महामार्गावर दरवर्षी सरासरी एक हजार लोकांचा अपघाती मृत्यू होतोे. महामार्ग वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, २०१३ ते २०१५दरम्यान ३ हजार ३५८ अपघात महामार्गावर झाले. २०१३मध्ये १ हजार १८६ मोठे अपघात झाले. त्यामध्ये २०१ जणांचा मृत्यू झाला. २०१४मध्ये महामार्गावर १०८४ अपघात झाले त्यामध्ये २०५ जणांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी १ हजार ८८ अपघातात १७४ जणांचा मृत्यू झाला.