शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

काशिद व मुरूड समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:41 IST

डिसेंबर महिन्यातील शनिवार व रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आज असंख्य पर्यटकांनी काशिद व मुरु ड येथे पर्यटनाचा आनंद लुटला. तसेच जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांसह अनेक शालेय विद्यार्थ्यांनी किल्ला पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. काशिद समुद्रकिनारा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने येथे शनिवारीच मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या. मुरु डपेक्षा जास्त गर्दी काशिद येथे पाहावयास मिळाली. येथील समुद्रकिनारा पाहण्यासाठी औरंगाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक तसेच काही परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले पाहावयास मिळाले.

मुरुड जंजिरा : डिसेंबर महिन्यातील शनिवार व रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आज असंख्य पर्यटकांनी काशिद व मुरु ड येथे पर्यटनाचा आनंद लुटला. तसेच जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांसह अनेक शालेय विद्यार्थ्यांनी किल्ला पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. काशिद समुद्रकिनारा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने येथे शनिवारीच मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या. मुरु डपेक्षा जास्त गर्दी काशिद येथे पाहावयास मिळाली. येथील समुद्रकिनारा पाहण्यासाठी औरंगाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक तसेच काही परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले पाहावयास मिळाले.या सर्व पर्यटकांनी समुद्रस्नान करून बनाना बोटिंगचा आनंद लुटला, तसेच सायंकाळी पॅरारायडिंगचा आनंदही लुटला. हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे आल्याने वाहनांची गर्दीच गर्दी झाली होती. सर्व हॉटेल, लॉजिंग बुक झाल्याने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येथे तासन्तास पर्यटकांना शिडाच्या बोटीची वाट पाहावी लागली. कारण गर्दीच खूप मोठी असल्याने १३ शिडांच्या बोटींवर ही मदार अवलंबून होती. याबाबत आमच्या प्रतिनिधीने जंजिरा पर्यटक सोसायटीचे चेअरमन इस्माईल आदमने यांच्याशी संपर्क साधून किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना होड्यांची वाट पाहावी लागत आहे, अशी विचारणा करताच ते म्हणाले की, जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करण्यासाठी १३ शिडाच्या होड्या आमच्या संस्थेतर्फे चालवल्या जातात. पर्यटक व शैक्षणिक सहली आल्याने येथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. सध्या डिसेंबर महिना सुरू असून यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. आमच्या संस्थेकडे दोन इंजिन बोटीसुद्धा आहेत. आम्हाला अशा गर्दीच्या वेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने परवानगी द्यावी म्हणजे आम्ही त्या बोटी चालवू शकू. जर या बोटी सुरू झाल्या तर पर्यटकांचा खोळंबा होणार नसल्याचा दावासुद्धा या वेळी आदमने यांनी केला आहे.दोन इंजिन बोटींना फक्त गर्दीच्या म्हणजेच शनिवार, रविवारी परवानगी देण्याची मागणी आदमने यांनी केली आहे. पर्यटकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून बोर्डाने परवानगी द्यावी, अशी मागणी येथे पर्यटकांनी केली आहे. या वेळी खोरा बंदरातसुद्धा गाड्यांच्या रांगा दिसून आलेल्या आहेत. येथूनसुद्धा जंजिरा किल्ला वाहतूक केली जाते. त्यामुळे येथेसुद्धा गर्दी पाहावयास मिळाली.