- संजय करडेमुरुड-जंजिरा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्यावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत जागर कार्यक्रम संपन्न झाला. मुरु ड समुद्र किनाऱ्यापासून चार किलोमीटरचे सागरी अंतर पार केल्यानंतर पद्मदुर्ग किल्ल्यावर पोहचता येते. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्यावर चहू बाजूला सागराच्या विशाल लाटा धडकत असतात.कोकण कडा मित्र मंडळ रायगड, मुरु ड नगरपरिषद, पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती, व मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पद्मदुर्ग जागर’ कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवप्रेमींनी संपूर्ण गड फुलांनी सजवला होता. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमापूर्वी गडाची स्वच्छता करण्यात आली होती.श्रीवर्धनहून आलेली शिवपालखी वाजतगाजत पहाटे गडावर आणण्यात आली. राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे राजू किर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला मुद्रांचा अभिषेक करण्यात आले. मंत्राच्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला.नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते गडपूजन करून शिवप्रतिमेला जलाभिषेक केला व इतिहास अभ्यासक पराग बद्रिके यांनी शिवरायांची राजनीती व सर्वधर्मसमभावाच्या वृत्तीचे दर्शन घडविणारे व्याख्यान दिले.शिवप्रतिमेचे पूजन झाल्यावर ढोलताशांच्या गजरात गडाच्या सर्वबुरु जावरून शिवपालखी शिवगर्जनेत नेण्यात आले. कोटेश्वरी मातेचे मूलस्थान हे पद्मदुर्ग किल्ल्यात असल्याने त्याचे पूजन राजपुरोहित प्रकाशस्वामी जंगम त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दांडपट्टा, तलवारबाजी, मलखांब आदी शौर्यखेळ सादर करण्यात आले.
हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत झाला ‘पद्मदुर्गचा जागर’, शिवघोषाने दुमदुमला किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 04:12 IST