शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पाेस्ट काेविड सेंटरचा पत्ताच नाही, रुग्णांची गैरसाेय टाळण्यासाठी केले जातात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:51 IST

Raigad : सरकारी रुग्णालयांतील डाॅक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून विविध उपाय सुचविले जात आहेत. दरम्यान, काेराेनाने स्वतःमध्ये जणूकीय बदल करीत ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे.

रायगड : काेराेना हाेऊन गेलेल्या रुग्णांना पुन्हा काेराेनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘पाेस्ट काेविड सेंटर’ अशी संकल्पना पुढे आली आहे. मात्र रायगड जिल्ह्यामध्ये अशी व्यवस्थाच नसल्याने बरे झालेल्या कोविडरुग्णांचे हाल हाेत आहेत.    सरकारी रुग्णालयांतील डाॅक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून विविध उपाय सुचविले जात आहेत. दरम्यान, काेराेनाने स्वतःमध्ये जणूकीय बदल करीत ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे. आधीच्या विषाणूपेक्षा बदललेला काेराेना ७० टक्के अधिक संसर्ग वेगाने पसरवित असल्याने पुन्हा एकदा जगाची झाेप उडाली आहे. त्यामुळे ज्यांना काेराेना हाेऊन गेलेला आहे त्यांच्यासह सर्वांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सरकार आणि प्रशासनाने स्पष्ट केले आहे.काेराेना हाेऊन गेलेल्यांना दम लागणे, थकवा येणे, केस गळणे यासह अन्य तक्रारी जाणवत आहेत. अशा रुग्णांनी सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधल्यास संबंधित डाॅक्टरांकडून त्यांना याेग्य ताे उपचार देण्यात येत आहे. ज्यांना काेराेना हाेऊन गेला त्यांच्याशी प्रशासकीय पातळीवरून संपर्क साधला जात नसल्याचे जिल्ह्यामध्ये चित्र आहे

काय काळजी घेतली जातेज्यांना काेराेना हाेऊन गेला आहे आणि त्यांना पुन्हा त्रास जाणवत आहे असे रुग्ण रुग्णालयामध्ये येतात किंवा फाेन करतात. ज्यांना रुग्णालयामध्ये उपचार देणे गरजेचे आहे त्यांना भरती करण्यात येते. कमी त्रास असणाऱ्यांना याेग्य ती औषधे घेण्यास सांगितले जाते. अशा रुग्णांनी सकस आहार घ्यावा, व्यायाम करावा, फळे, हिरव्या भाज्या यांचे सेवन करावे, असा सल्ला त्यांना दिला जाताे. 

काही दिवसांपूर्वी ज्यांना काेराेना हाेऊन गेला होता आणि पुन्हा त्रास जाणवत आहे अशा सहा रुग्णांनी संपर्क साधला हाेता. त्यांच्यावर याेग्य ते उपचार करण्यात आले. काेराेनातून बाहेर पडल्यानंतर पुढील तीन महिने काळजी घेणे गरजेचे आहे. अति श्रमाची कामे करणे त्यांनी टाळावे आणि सकस आहाराचा जेवणात समावेश करावा.- डाॅ. विक्रमजीत पडाेळे,वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस