शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:13 IST

पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते.

- जयंत धुळपअलिबाग - पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते. यावर मात करून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज आणि त्या आधारे कृषी सल्ला देण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत एकूण ६० स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात स्वयंचलित केंद्राचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. उपग्रहाशी संलग्न ६० स्वयंचलित हवामान केंद्रात दर १० मिनिटांनी हवामानविषयक नोंदी संकलित केल्या जातात. त्यानुसार अचूक हवामान अंदाज बांधून त्यावर आधारित कृषीसल्ला शेतकºयांना देण्यात येत आहे.रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती एकसमान नाही. परिणामी किनारीभागात पडणारा पाऊस आणि पूर्वेकडील डोंगरी भागातील पाऊस यामध्ये तफावत असते. महाड-पोलादपूरमध्ये अतिवृष्टी होवून सावित्री नदीला पूर येतो. त्याच वेळी उरण, पनवेल, खालापूर तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. परिणामी सध्याच्या प्रचलित मंडळ स्तरावर असलेल्या पर्जन्यमापकातून प्राप्त पावसाच्या नोंदींची सरासरी काढून जिल्ह्यातील शेतकºयांकरिता देण्यात येणारा कृषी सल्ला अचूक असेलच असे सांगता येत नाही. परिणामी अनेकदा शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे प्रसंग यापूर्वी अनेक घडले आहेत.दर १० मिनिटांनी घेतल्या जातात नोंदीया हवामान केंद्राकडून प्रत्येक तालुक्यातील ४ वेगवेगळ्या ठिकाणची दर १० मिनिटांची पर्जन्यमानाच्या नोंदीबरोबरच वाºयाचा वेग, वातावरणातील आर्द्रता ही माहितीही उपलब्ध होत आहे. याशिवाय हवामानाचे पूर्वानुमान, कीडरोगांची पूर्वसूचना यासारख्या बाबींसाठी या केंद्रांची मोठी मदत होणार आहे. लहरी पर्जन्यराज्याचा पूर्वअंदाज घेऊन आता शेती करता येणार असल्याने, पिकांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाचा आहे.

टॅग्स :weatherहवामानRaigadरायगड