शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

उन्हेरे धरणाला लागली गळती, पाणी साठवण क्षमता झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 00:44 IST

सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणाला ठिकठिकाणी गळती लागल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणाला ठिकठिकाणी गळती लागल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. गळतीमुळे हे धरण आताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. धरणाची विहीर (जॅकवेल) ही पूर्णपणे मोडकळीस आली आहे. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था उन्हेरे पंचक्र ोशीची झाली आहे.सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. आजही येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तालुक्यात साधारणपणे पाच धरणे आहेत. त्यापैकी उन्हेरे धरणाची मोठी दुरवस्था झाली आहे. गळतीमुळे धरण पात्राची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे जानेवारीतच हे धरणा कोरडे पडायला सुरु वात झाली आहे. उन्हेरे धरणामुळे चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना फार मोठा आधार आहे. या धरणामुळे येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. मात्र, या धरणाच्या दुरु स्तीकडे पाटबंधारे विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या धरणाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने या धरणाकडे लक्ष देऊन विहिरीची दुरु स्ती करणे आवश्यक आहे. धरणपात्रात साचलेला गाळ काढून, साठवण क्षमता वाढवणे तसेच पिचिंग करणे यासारखी कामे करण्याची मागणी उन्हेरे परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी उन्हेरे धरणाची दुरु स्ती करून धरणाचे वयोमान वाढवावे व स्थानिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे.>चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीसह उन्हेरे पंच क्रोशीतील नागरिकांना उन्हेरे धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो; परंतु या वर्षी धरणात मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. धरणाच्या दुरु स्तीबाबत ग्रामपंचायतीमार्फत पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार क रण्यात आला आहे.- सुवर्णा महाडिक,सरपंच, चिखलगाव