शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा ट्रेंड वाढतोय, अपघाताची भीती

By निखिल म्हात्रे | Updated: November 29, 2023 16:50 IST

तीनशे रुपयांपासून दीड हजारपर्यंत खर्च करून एलईडी बल्ब लावला जात आहे. 

अलिबाग - एलईडी बल्बचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या बल्बचा पादचाऱ्यांसह अन्य वाहन चालकांच्या डोळ्याला त्रास होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रस्त्यांवरील खड्डे, गतिरोधकांवरील पांढऱ्या पट्ट्यांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून पर्यायी मार्ग म्हणून प्रखर उजेडासाठी दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा प्रकार वाढला आहे. काही जण रात्रीच्यावेळी रस्ता ठळकपणे दिसावा तर काही जण हौस म्हणून एलईडी बल्ब दुचाकीला लावत आहेत. तीनशे रुपयांपासून दीड हजारपर्यंत खर्च करून एलईडी बल्ब लावला जात आहे. 

जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर एलईडी बल्बची दुकाने थाटली आहेत. मात्र रात्रीच्यावेळी प्रवास करणारे पादचारी, प्रवासी, सायकलस्वार व अन्य वाहनचालकांना या एलईडी बल्बचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. प्रखर उजेडामुळे डोळे दिपले जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे.रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन व जिल्हा वाहतूक शाखेकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र एलईडी बल्ब लावणाऱ्यांवर कारवाई करताना दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

हौस म्हणून प्रखर उजेडासाठी दुचाकीला एलईडी बल्ब लावणे बेकायदेशीर आहे. ज्या दुचाकीला कंपनीचे बल्ब लावले आहे. त्याच नियमात राहून बल्ब लावणे आवश्यक आहे. गैरप्रकार कोणीही करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या जातील.- महेश देवकाते , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण.

एलईडी बल्बला प्रखर उजेड आहे. या उजेडाचा त्रास डोळ्यांच्या बुवळ्यांना होऊन डोळे दिपण्याचे प्रकार वाढत आहेत. काही क्षण डोळ्यांवर अंधार पसरतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. विजय जाधव, नेत्ररोग तज्ञ

टॅग्स :alibaugअलिबाग