शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मुलांच्या विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची :  डॉ. नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 10:17 IST

उरण एज्युकेशन सोसायटीच्या विशेष निमंत्रणावरून या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

मधुकर ठाकूर 

उरण  : मुलांनी आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शिक्षणात यश मिळवावे. प्रत्येक विद्यार्थी हा यशाचा मार्ग चोखाळू शकतो. मात्र पालकांनी देखील सुजाण पालकत्वाच्या भूमिकेतून मुलांना अधिक मार्क्स मिळविण्यासाठी दबाव आणता कामा नये. आपल्या पाल्यांना मोकळ्या वातावरणात शिक्षण घेऊ द्या, बागडू द्या. मुलांना त्यांची स्वतःची स्पेस निर्माण करू द्या त्यातूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल. अर्थात मुलांच्या सर्वांगीण विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शुक्रवारी (६) विधान परिषद उपसभापती  डॉ नीलम गोऱ्हे यांनी उरण येथे केले. येथील उरण एज्युकेशन सोसायटीच्या विशेष निमंत्रणावरून या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, 'प्रत्येक मूल हे सुंदर असते, त्यात एक यशस्वी व्यक्ती दडलेली असते. त्यावर योग्य संस्कार केले की ती आकारास येते. प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस योजना राबविण्यात यावी याबाबत मी आग्रही आहे. जेणेकरून रॅगिंग किंवा बुलिंग सारख्या प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण आणता येईल. तसेच विद्यार्थिनींना काही तक्रारी असतील तर त्याबाबत त्यांना शाळा व्यवस्थापनाकडे संपर्क साधता येईल.' यावेळी सर्व पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांनी हार्दिक अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या. उरण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांच्या १०० टक्के निकलाच्या परंपरेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. रायगड जिल्ह्याच्या एका भागात अनेक वर्षांपासून कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय ही संस्था उत्तम काम करीत असल्याबद्दल सर्व विश्वस्त मंडळाचे अभिनंदन  केले. 

यावेळी या संस्थेचे अध्यक्ष तन्सुख जैन आणि सचिव आनंद भिंगार्डे हे उपस्थित होते. याचसोबत डॉ. संजय व डॉ. श्रुती काळकेकर दाम्पत्य, पत्रकार संजय जोग, विश्वस्त मंडळाचे इतर सदस्य, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उपजिल्हा संघटिका ॲड.सौ.ममता पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख सौ. ज्योती म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेuran-acउरण