शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलने झाली उदंड, पण प्रश्न कायम! उपोषणाची हत्यारे निकामीच

By निखिल म्हात्रे | Updated: December 26, 2022 18:44 IST

गेल्या बारा महिन्यांतील सुमारे ४० टक्के आंदोलनात शिस्त मोडल्याची कारवाई करण्यात आली आहे.

अलिबाग : पिण्यासाठी पाणी, प्रकल्पग्रस्ताचे पुर्नवसन आणि औद्योगिक कंपन्यांतील प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १६३ आंदोलन, उपोषण व मोर्चे काढण्यात आली. मात्र, बहुतांश प्रश्न ‘जैसे थे ’असून केवळ आश्वासनावरच आंदोलकांची बोळवण करण्यात आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील अहिंसेच्या मार्गाने वापरले जाणारे हत्यार राज्यकर्ते व प्रशासनाच्या निष्ठुरतेपुढे कुचकामी ठरली आहेत.विविध मागण्या, प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्ह्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई- गोवा महामार्गासह जिल्ह्यात ठिकठिकाणी व अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षभर विविध विषयासंबंधी आंदोलने झाली. त्यामध्ये १ जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत एकूण ९७ उपोषण ९ मोर्चे, तर ५७ आंदोलनाचा समावेश आहे.

गेल्या बारा महिन्यांतील सुमारे ४० टक्के आंदोलनात शिस्त मोडल्याची कारवाई करण्यात आली आहे. बडगा उगारण्यात आला होता. घरकुलासंदर्भात इंदूबाई तिखंडे या आपल्या मुलासह गेल्या १० महिन्यांपासून जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत तर उर्मिला नाईक मोजणीसंदर्भात, दिलीप जोग यांनी रस्ता, जिल्हा रुग्णालयासंदर्भात, अजय उपाध्य यांनी गॅस दरवाढ संदर्भात, गोपाळ शिर्के यांनी रस्ता सुधारण्यासंदर्भात, कोकाटे यांनी रिलायन्स कंपनीसंदर्भात तर दत्तात्रेय हिरू गायकवाड यांनी वीज मीटर मिळण्यासाठी अशी एकूण ९७ उपोषणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली.

तर आंदोलन, धरणे आंदोलन, हल्लाबोल आंदोलन, काम बंद आंदोलन, चक्का जाम आंदोलन, जनजागृती आंदोलन, वाहतूक बंद आंदोलन, रजा बंद आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, ठिय्या आंदोलन, ढोल-ताशा गजर आंदोलन, थाळी नाद आंदोलन, सामूहिक रजा बंद आंदोलन, भीक मागो आंदोलन, अन्नत्याग आंदोलन, अशी सुमारे ५७ आंदोलने झाली. त्यामध्ये सर्वाधिक आंदोलन ही जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प व अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्ती संदर्भात करण्यात आली. गेल कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांना पोलिसांच्या कारवाईला ही सामोरे जावे लागले आहे. वर्षभरात स्वत:च्या न्याय व हक्कांसाठी लढणाऱ्या उपोषण व आंदोलनकर्त्यांपैकी ४० टक्के नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेले आहेत.

टॅग्स :alibaugअलिबाग