शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या सवलतीने खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर कुऱ्हाड

By निखिल म्हात्रे | Updated: March 1, 2024 16:56 IST

खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले.

अलिबाग - महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत लागू केल्याने एस टी च्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. सवलतीच्या दरात प्रवास करायला मिळत असल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी याचा खाजगी प्रवासी वाहतूक दारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करायचा असा प्रश्न  त्यांना पडला आहे.

एस टी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवन वाहिनी समजली जाते. काही वर्षा पूर्वी पर्यंत ग्रामीण जनतेसाठी एस टी हे एकमेव प्रवासाचे साधन होते. दुर्गम डोंगराळ भागात जिथं जिथं रस्ता पोहोचला तिथं तिथं एस टी ची प्रवासी वाहतूक सुरू झाली आणि ग्रामीण जनतेची पायपीट थांबली. पुढे खाजगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आणि एस टी ची प्रवासी संख्या घटली. त्याचा एस टीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. एस टीच्या फेऱ्या मर्यादित असल्याने ग्रामीण प्रवाशांची पावले रिक्षा, मिनीडोअर सारख्या खाजगी वाहनाकडे वळली. आणि एस टी चा प्रवास तोट्याच्या दिशेने सुरू झाला.

खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन आणि सहा आसनी वाहनांची संख्या वाढली. अनेकांनी कर्ज काढून या व्यवसायात उडी घेतली. किमान कुटुंबाचे गुजराण करता येईल इतकी कमाई या व्यवसायातून होत होती. कोरोना सारख्या जागतिक महामारीचा फटका रिक्षा, मिनीडोअर  चालकांना बसला. लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आणि हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. यात अनेक वाहतूक दारानी कर्ज काढून गाड्या घेतल्या होत्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले. शासनाकडून देखील कुठलीच मदत किंवा सवलत मिळाली नाही त्यामुळे या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले.

कोरोना महामारीची साथ संपल्यानंतर हा व्यवसाय हळूहळू पूर्व पदावर आला असतानाच या व्यवसायावर नवीन आपत्ती येवून कोसळली. राज्य सरकारने महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना एस टी च्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्याचा विपरीत परिणाम रिक्षा मिनीडोअर व्यवसायावर झाला. एस टी च्या लाल परीला महिलांची पसंती मिळू लागली. रिक्षा मिनी डोअर कडील ओढा कमी झाला. प्रवासी संख्या घटल्याने त्यांचा व्यवसाय डबघाईला आला. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या होत्या त्यांना कर्जाचे हप्ते फेडणे जड जाऊ लागले आहे. त्यातच डिझेलच्या दरात झालेली वाढ त्रासदायक ठरते आहे. दरवाढीमुळे प्रवासी भाड्यात वाढ करणे अपरिहार्य झाले असून प्रवाशांचा ओढा एस टी कडे वाढतो आहे. अशा स्थितीत व्यवसाय कसा सुरू ठेवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.राज्‍य सरकारने एसटी प्रवास भाडयात महिलांना ५० टक्‍के सवलत दिली आहे. त्‍यामुळे रायगडच्‍या महिलांना लालपरी अधिक लाडकी झाली आहे. रायगड जिल्‍हयात एसटीने प्रवास करणारया महिलांच्‍या संख्‍येत जवळपास ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मागील साडेचार महिन्यात जिल्‍हयात  ७९ लाख ६ हजार ९२ इतक्या महिला प्रवाशांनी  या सवलत योजनेचा लाभ घेत प्रवास केला आहे.मी बँकेचे कर्ज काढून मिनीडोअर घेतली. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालत होता. परंतु महिलांना एस टी प्रवासात सवलत दिल्या पासून आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकदा डिझेलचे पैसेदेखील निघत नाहीत. बँकेचे हप्ते फेडताना नाकीनऊ येत आहेत.- प्रणव दळवी, मिनीडोअर चालक

टॅग्स :alibaugअलिबाग