शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जिल्ह्यात पोलीस विभागाला भेडसावते ३२७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता

By निखिल म्हात्रे | Updated: October 22, 2023 19:34 IST

अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध पोलीस यंत्रणेला अक्षरशः कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपैकी ३२७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता पोलीस विभागाला जाणवत आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची २७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे.

मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील २७ पोलीस ठाण्यांमध्ये दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र विभागासाठी पोलीस अधिक्षक ते पोलीस उपनिरिक्षकांची एकूण २४७ पदे मंजूर आहेत. मात्र यामधील २७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून राज्य सराकरकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. तर ३०० पोलीस हवालदार, पोलीस नाईक, सहाय्यक फौजदार, पोलीस शिपाई यांची कमतरता पोलीस विभागाला जाणवत आहे.

327 कर्मचार्‍यांची पदे रिक्त -रायगड जिल्हा पोलीस दलात 43 पोलीस अधिकार्‍यांव्यतिरिक्त 227 पोलीस कर्मचार्‍यांची पदेही रिक्त आहेत. 2 हजार 317  पोलीस कर्मचार्‍यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये 2 हजार 2090 पदे भरण्यात आली आहेत. रिक्त पोलीस कर्मचार्‍यांमध्ये सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल यासह इतर पदांचा समावेश आहे.

पोलीस दल रिक्त अधिकारीपद - मंजूर पदे - भरलेली पदे - रिक्त पदेपोलीस अधिक्षक - १ - १ - ०अप्पर पोलीस अधिक्षक - १ - १ - ०पोलीस उपविभागीय अधिकारी - ९ - ९ - ०पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक : २३६ : २०९ : २७ पोलीस कर्मचारी : २०८१ : १७८१ : ३००

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडPoliceपोलिस