शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी बेटाला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाने डिसेंबरलाच गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2023 14:16 IST

तीन गावे, व्यावसायिक, देशी-विदेशी हजारो पर्यटकांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट, बोटीने पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्रामपंचायतीची मागणी 

मधुकर ठाकूर

उरण : यावर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना मे महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाच्या पाण्याची पातळी डिसेंबर महिन्यातच पुरती खालावली आहे. परिणामी जग प्रसिद्ध घारापुरी बेटावर डिसेंबरपासूनच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पर्यटक, बेटवासियांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी समुद्रमार्गे इतर ठिकाणाहून बोटीतून पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,  गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर राजबंदर, मोराबंदर,शेतबंदर अशी तीन गावे आहेत. या बेटावरील जगप्रसिध्द कोरीव लेण्या पाहण्यासाठी दररोज हजारो तर वर्षभरात देशी-विदेशी लाखो पर्यटक येतात. पर्यटक आधारित बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदी लघुउद्योग आहेत.या सर्वांना पाणी पुरवठा करणारे जुने एकमेव धरण आहे. धरणात साठलेले पाणी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्याला जातो. दरवर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणात मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धरणात पाणीसाठाही मर्यादित शिल्लक राहिलेला आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिल्लक राहणारा पाणीसाठा कमी पावसामुळे डिसेंबर महिन्याअखेरच धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. जेमतेम पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना पाणी पुरवठा कसा करावा असा गंभीर प्रश्न आता घारापुरी ग्रामपंचायतीला पडला आहे. घारापुरी हे बेट असल्याने टॅकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. ग्रामपंचायतीकडेही पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नाही. बेटावरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी समुद्रमार्गे बोटीने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेटावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी  घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,उरण गटविकास अधिकारी,उरण तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Waterपाणी