शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकूरवाडी रस्ता कागदावरच!

By admin | Updated: June 22, 2016 02:06 IST

कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या ठाकूरवाडी ते आषाणे रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता भलत्याच रस्त्याचे काम दाखवून शासनाची दिशाभूल केल्याची

कांता हाबळे, नेरळकर्जत तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या ठाकूरवाडी ते आषाणे रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता भलत्याच रस्त्याचे काम दाखवून शासनाची दिशाभूल केल्याची तक्रर सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्याकडे करण्यात आली आहे. सुमारे ६० लाखांच्या शासकीय निधीचा दुरुपयोग करून आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते गो. रा. चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे.आषाणे ते ठाकूरवाडी रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक व नकाशे यास अधीक्षक अभियंता रायगड यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी कामाचे कार्यारंभ आदेश २८ फेब्रुवारीला निर्गमित केले. या कामाची निविदा ठाणे येथील सिद्धिनाथ कन्स्ट्रक्शन यांना मिळाल्या असून त्यांनी निविदेप्रमाणे काम न करताही मंजूर नसलेल्या कामासाठी त्यांना देयके अदा केली आहेत. मंजुरी आदेशाप्रमाणे ठाकूरवाडी रस्त्याचे काम न करता नेरळ -कर्जत रस्त्यापासून आषाणेपर्यंतचे केवळ ५६० मीटर अंतरापर्यंतचे काम केले आहे.प्रत्यक्षात ठाकूरवाडी ही आदिवासी वस्ती डोंगर माथ्यावर १,६१० मी. (साधारणत: पावणे दोन किमी ) इतक्या अंतरावर आहे. आदिवासींना विकासाचा रस्ता मोकळा व्हावा या हेतूने शासनाने तेराव्या वित्त आयोगातून ही मंजुरी दिली. या तक्र ार अर्जातील गंभीर बाब म्हणजे मंजूर रस्त्याची संपूर्ण जमीन वन जमीन क्षेत्रातील असून मान्यता आदेशातील सहाव्या अटीनुसार भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. परंतु भूसंपादनाची डोकेदुखी नको असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचा उपयोग करत निधी खर्च केला. त्यामुळे या कामाची दक्षता पथक, मुंबई यांच्याकडून चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कार्यकारी अधिकारी आर. एस. मोरे यांनी यासंदर्भात उप अभियंता यांच्याकडे विचारणा करा, असे सांगितले.शासनाचा आषाणे ते ठाकूरवाडी असा ६० लाखांचा रस्ता मंजूर असताना बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांनी ठेकेदाराशी संगनमत करून जुनाच रस्ता दुरु स्त केला व याच रस्त्यावर ६० लाख खर्च दाखवला आहे. मुख्य रस्त्यापासून आषाणे गावापर्यंतच्या ६५० मी. रस्त्याच्या कामाचा हा खर्च दाखवला आहे. - गो.रा. चव्हाण, माहिती अधिकार कार्यकर्ते, डिकसळ