शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उरण ग्रामीण भागातील वीजेची समस्या दूर करण्याची ठाकरे गटाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2023 17:10 IST

१० ग्रामपंचायत हद्दीतील गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण.

मधुकर ठाकूर, उरण : उरण पुर्व विभागातील ग्रामीण भागातील १० ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय तत्काळ दूर करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (११)शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ) तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी  उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवणे यांची भेट घेतली.

उरण पुर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, बांधपाडा, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे,आवरे, गोवठणे आदि ग्रामपंचायत हद्दीतील गावातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गृहीणी,छोटे-मोठे व्यावसायिक, रुग्ण,नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे.त्यामुळे चिरनेरच्या कलानगरात सुमारे २५-३० गणपतीच्या मूर्ती घडणारे कारखानदार आणि काम करणाऱ्या शेकडो मुर्तीकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मुर्तीकार चांगलेच त्रस्त झाले आहेत.

उरणच्या ग्रामीण भागातील गावांतील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (११) शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ) तालुका प्रमुख संतोष ठाकूर तसेच पुर्व विभागातील काही पत्रकारांनी उरण महावितरण विभागाचे उप अभियंता विजय सोनवणे यांची भेट घेतली.यावेळी तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व पत्रकारांनी वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.तसेच बांधपाडा व दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने सब स्टेशन उभारण्याची तसेच भेंडखळ खाडीतील केबल तसेच विद्युत पोल रस्त्यालगत हलविण्याचीही मागणी केली.चर्चेअंती उप अभियंता विजय सोनवणे यांनी गणेशोत्सवात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सध्या महावितरण कंपनीचे कर्मचारी काम करीत असल्याचे सांगितले.तसेच वीजेची सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी सकारात्मक झालेल्या चर्चेनंतर दिले.

टॅग्स :uran-acउरणelectricityवीज