शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी बोगद्याच्या कंत्राटदाराच्या कार्यालयाचे टाळे काढल्याने तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 06:41 IST

सामूहिक राजीनामे देण्याचा भोगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा इशारा

पोलादपूर : येथील कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स या कंपनीने येथे उभारलेल्या प्लॉन्टला भाडेकर न दिल्याने भोगाव ग्रामपंचायतीने बुधवारी दुपारी टाळे ठोकले होते; मात्र रात्री उशिरा पंचायत समिती प्रशासनाने हे टाळे उघडले. यामुळे भोगाव ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढत ग्रामपंचायत सदस्यांनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे.

गणपती उत्सव तोंडावर असल्याने ग्रामस्थांनी सबुरी घेतली असून उत्सवानंतर उग्र आंदोलन करणार आहेत. शिंदे डेव्हलपर्सने जवळपास २६ लाख रुपये थकविले आहेत. यामुळे भोगाव ग्रामपंचायतीने या ठेकेदाराच्या प्लान्टसह जनरेटर व पेट्रोल पंप बुधवारी सील केला होता. मात्र रात्री अचानक सूत्रे फिरल्यानंतर गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी महिला ग्रामसेविका भोसले यांना सील काढण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानंतर हा प्लॉन्ट खुला करण्यात आला आहे. मात्र यामुळे भोगाव ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांनी दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत. शुक्रवारी त्यांनी पंचायत समितीवर मोर्चा काढत गटविकास अधिकारी हटावचा नारा दिला आहे. माजी सरपंच राकेश उतेकर यांनी गणपतीपूर्वी योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे. 

आमदारांची मध्यस्थीशिंदे डेव्हलपर्स हे कशेडी बोगद्याचे काम करीत आहेत. ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे बोगद्याच्या कामावर परिणाम होणार असल्याने आमदार भरत गोगावले यांनी सुपुत्र विकास गोगावले व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे यांना ताबडतोब पंचायत समितीमध्ये पाठवले.  त्यांनी भोगाव ग्रामपंचायतच्या पाणी व रस्त्याची सुविधा येत्या पाच-सहा दिवसात संबंधित ठेकेदाराने करून द्यावी. गणपतीपर्यंत ग्रामस्थांनी शांत रहावे, अशी समजूत काढली. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड