शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दहा ग्रामपंचायती बिनविराेध; 848 उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:21 IST

निकालाआधीच उधळला गुलाल; एक हजार ५८८ जण निवडणूक रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८४० जागांसाठी एक हजार ५८८ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल ८४८ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका हाेण्याआधीच या ठिकाणी गुलाल उधळण्यात आल्याने जल्लाेषाचे वातावरण आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल करताना, ८४ जागांसाठी दाेन हजार ४३६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या हाेत्या. मात्र, साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळी ८४८ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मदत संपल्यानंतर निवडणूक विभागाचा उमेदवारांना चिन्हवाटप करण्याचा कार्यक्रम होता. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेमुळे आणि इंटरनेटच्या कासवगती मुळे रात्री उशिरापर्यंत काम सुरू हाेते. ८८ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. 

ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवार रिंगणात कायद्याने ५० टक्के महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे ८८ ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवारीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. राेहा, पनवेल या तालुक्यांमध्ये अनुक्रमे २१ आणि २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेत आहेत. या ठिकाणी सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे अधिक लक्ष लागण्याचे कारण म्हणजे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत आहे. त्याचप्रमाणे, अलिबाग तालुक्यातील पेझारी या ग्रामपंचायतींमध्ये शेकापचेच वर्चस्व आहे, तसेच शेकापच्या बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायत असल्याने सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. पनवेल तालुक्यात २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २२८ जागांसाठी ४३२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. राेह्यात २१ ग्रामपंचायतीच्या १९१ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत. कर्जतमधील ९ ग्रामपंचायतीमधील ८९ जागांसाठी १८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. माणगावमधील देवळी, लाखपाले, टेमपाले, महाड- भेलाेशी, आसनपाेई, पनवेल-आकुर्ली, खानावले, कर्जत-हुमगाव, श्रीवर्धन -कारीवणे, म्हसळा- काेल्टे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून ८४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. १,५८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत.-सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी, रायगड