शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ, उरण परिसरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 02:48 IST

उरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

उरण - उरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तापमान नियंत्रणात आणण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक कंटेनर यार्डमध्ये जागेच्या ३० टक्के जागेत झाडे लावण्याची आवश्यकता आहे. मात्र, याकडे कंपन्या आणि सिडकोच्या विविध विभागांकडून दुर्लक्षच होत असल्याने उरण परिसरात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.उरण परिसरात जेएनपीटी, ओएनजीसी, नौदल, बीपीसीएल, जीटीपीएस यासारखे अनेक शासकीय प्रकल्प आहेत. प्रकल्पावर आधारित अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू आहेत. जेएनपीटी तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आहे. या बंदरातून वर्षाकाठी सरासरी ६० लाख कंटेनर मालाची आयात-निर्यात होते.कंपन्या आणि कंटेनर यार्ड उभारण्याच्या कामासाठी प्रचंड प्रमाणात माती-दगडाचे भराव करण्यात आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्या आणि नैसर्गिक संपदेचा ºहास करण्यात आल्या आहे, याचे दुष्परिणामही आता जाणवू लागले आहेत. उरण आणि जेएनपीटी परिसरात कंटेनर यार्डमधील लाखो कंटेनरमुळे परिसरातील वातावरण कमालीचे वाढत आहे.उरण परिसरात सिडको प्लॅनिंग अ‍ॅथारिटी म्हणून काम पाहते. परिसरात सिडको अथवा महसूल विभागाच्या जमिनींवर होणाऱ्या कंटेनर यार्डच्या उभारणीला सिडकोच परवानगी देते. मात्र, परवानगी देतानाच यार्डच्या एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के जागेत तापमान कंट्रोल आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावण्याची आवश्यकता आहे. यार्डमध्ये कंटेनरच्या भाड्यापोटी इंच-इंच जागेसाठी भाडे आकारले जाते आणि या सगळ्यात वृक्ष लावगड आणि संवर्धनाकडे अक्षम्य दुर्लक्षच होत आहे. परिणामी, लाखोंच्या संख्येने ठेवण्यात येणाºया लोखंडी, पत्र्याच्या डब्यांमुळे तापमानात प्रचंड वाढ झाल्याची माहिती शासकीय यंक्षणेकडून दिली जात आहे.शासनाचे ग्रामपंचायतींना पत्रउरण तालुक्यातील ग्रामपंचायतींना शासनाकडून पत्र पाठवून हद्दीत किती क्षेत्रात कंटेनर यार्ड उभारण्यात आल्याची माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, अद्याप ही माहिती उपलब्ध झालेली नाही. कंटेनर यार्डसाठी जागा अलॉटमेंट करताना जागेच्या ठरावीक क्षेत्रात झाडे लावण्याचे बंधन घातलेल्या अ‍ॅग्रिमेंटची संख्याही नगण्यच असल्याचेही दिसून येत आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगड