शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

तेजस एक्स्प्रेसच्या धडकेने रेल्वेच्या तीन कामगारांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 15:30 IST

मुंबईकडे जाणा-या तेजस एक्प्रेसने धडक दिल्याने रेल्वेच्या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यातील जिते गावाजवळ रविवारी रात्री उशिरा घडली.

प्रदीप मोकलवडखळ- मुंबईकडे जाणा-या तेजस एक्प्रेसने धडक दिल्याने रेल्वेच्या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यातील जिते गावाजवळ रविवारी रात्री उशिरा घडली. पनवेल ते पेण रेल्वे मार्गावर सध्या काम सुरू आहे. जिते येथेही काम सुरू असून, त्यासाठी रेल्वेचे काही कंत्राटी कामगार रेल्वे रुळाजवळ काम करण्यासाठी आले आहेत.  त्यापैकी काही कामगार रविवारी राञी  9  वाजण्याच्या सुमारास जिते गावात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून ते परत येत असताना रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगाने जाणा-या तेजस एक्स्प्रेसने अशोक बारे (३०), भीमसेन गुलकर(४५) व अजय दांडोडिया (२०, सध्या रा. जिते रेल्वे स्टेशन,  मूळ रा. मध्य प्रदेश) यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, तिघांचाही गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.  या घटनेचे वृत्त समजताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड हे आपल्या सहका-यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही मृतदेह पेण येथील शासकीय रुग्णालयात आणले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून दादर सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड. कॉ. सोनकर हे करीत आहेत. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.