शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प नागरिकांची गैरसोय

By वैभव गायकर | Updated: March 17, 2023 19:28 IST

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी पनवेलसह रायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे.

पनवेल: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी पनवेलसहरायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पंचायत समिती,प्रांत कार्यालय,तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ण ठप्प झाले आहे.

पनवेल महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या संघातुन माघार घेतल्याने पालिकेचे कामकाज सुरळीत सुरु आहे.कृषी, महसूल, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या कामांसाठी अलिबागमधील विविध सरकारी कार्यालयात हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात; पण विविध मागण्यांसाठी कर्मचारी, शिक्षकांनी मंगळवारी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या आंदोलनाचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला आहे.

सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करावे, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे निरसित करू नका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, अशा अनेक मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली होती. 

यावेळी आंदोलकांनी निदर्शनासह घोषणाबाजी केली.महसूल, वन, आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादी सर्व विभागांतील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, विविध प्राधिकरण, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिचारिका व कर्मचारी, सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व चतुर्थ श्रेणी (गट ड) कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी, सफाई कामगार, सर्व शासकीय कार्यालयातील अंशकालीन, रोजंदारी व कंत्राटी कर्मचारी, महिला परिचर विभागातील वाहनचालक अशा 62 विभागांत 15 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी जिल्ह्यातून या संपत सहभागी आहेत.14 मार्च पासुन पुकारलेल्या संप दिवसेंदिवस चिघळत चालला असुन नागरिकांची कामे यामुळे रखडली आहेत.

 

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगडTeacherशिक्षक