शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसी दुर्घटना : ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 01:00 IST

अनेक गावांमध्ये उमटले पडसाद, १५ किमी परिसरात जाणवले धक्के

- वैभव गायकरपनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट (रामके) या रासायनिक घनकचरा विघटन करणाऱ्या कंपनीत सोमवारी सकाळी केमिकल्सचे विघटन करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा दहा ते पंधरा किमीचा परिसर हादरला असून अपघातात एक जण गंभीर झाला आहे.स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, अनेक गावांना हादरे बसले. विशेष म्हणजे केमिलकलचे विघटन करण्यासाठी वापरात असलेली जेसीबी मशिनदेखील स्फोटाच्या तीव्रतेने पलटी झाली. यात जेसीबी चालक संतोष पाटील जखमी झाला.मुंबई वेस्ट मॅनेजमेंट (रामके) या कंपनीत नवी मुंबईसह मुंबई शहरातील रासायनिक कचºयावर प्रक्रिया करून त्याचे विघटन केले जाते. येथील रसायनिक प्रदूषणामुळे रहिवासी त्रस्त असून याबाबत अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या आहेत, तसेच मोर्चे, निदर्शने, आंदोलनही करण्यात आले आहे. मात्र कंपनी प्रशासनामार्फत कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.अतितीव्रतेच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरल्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. नियमाचे उल्लंघन करून अनेकांचे जीव संकटात टाकल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.रामके कंपनीमधील दुर्घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे बबन पाटील, नगरसेवक हरेश केणी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी रामके कंपनीत धाव घेतली. स्फोटाचे मुख्य कारण लपविण्यासाठी कंपनी प्रशासनाकडून विस्फोट झालेले ड्रम लपविण्यात आल्याचा आरोप यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी केला. रामके कंपनीतर्फे झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा करण्यात आला नाही.भोईरपाडा गावात स्फोटाचे सर्वांत जास्त पडसादरामके कंपनीलगत भोईरपाडा हे गाव आहे. या गावाला स्फोटाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. गावात असलेल्या ३० ते ४० घरांना तडे गेले आहेत. अनेक घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. स्वयंपाकगृहातील भांडी देखील पडली आहेत. सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना मोठा स्फोट झाल्याने घर हादरले, खिडक्यांच्या काचा फुटल्याने भूकंप झाल्याचा भास झाला. मात्र जीव वाचवण्यासाठी बाहेर पडल्यावर रामके कंपनीमधून धुराचे लोळ दिसल्याचे भोईरपाडा येथील रहिवासी पप्पू भोईर यांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीBlastस्फोट