शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा स्फोटप्रकरण: रामके कंपनीला अद्याप क्लीन चिट नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 04:47 IST

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कसून चौकशी सुरू

पनवेल : तळोजा एमआयडीसीतील रामके कंपनीत झालेल्या स्फोटाची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कसून चौकशी सुरू आहे. आठवडाभरात ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे, त्यामुळे रामके कंपनीला अद्याप क्लीन चिट दिली नसल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एम. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घटनेची चौकशी करताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने संबंधित रसायन कोठून आले? त्याची तीव्रता काय होती? कशा प्रकारे या रसायनाचे विघटन करण्यात आले? यासंदर्भात माहिती गोळा केली आहे. आठवडाभरात हा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.तिसऱ्या दिवशी उशिरापर्यंत तळोजा पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांनी दिली.रामके कंपनीतील काही कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळल्याचे बोलले जात आहे. संबंधित स्फोट सर्व रसायन जमा केलेल्या जागेवर झाला असता, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती, अशी शक्यता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एम. आर. पाटील यांनी व्यक्त केली.भरपाईची मागणीघटनेत नुकसान झालेल्या घरांना कंपनीने भरपाई द्यावी. अनेक घरांना तडे गेले असून, कंपनीचे प्रतिनिधी अद्याप आमच्या गावात पाहणी करायलाही आले नसल्याचा आरोप भोईरपाडा येथील रहिवासी पप्पू भोईर यांनी केला. येथील प्रदूषणामुळे जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागत असल्याने ही कंपनी बंद करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी या घटनेत नुकसान झालेल्या घरांची भोईरपाडा या ठिकाणी जाऊन पाहणी केली असून, अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे.

टॅग्स :Blastस्फोटRaigadरायगड