शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती उत्खननावर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:16 IST

रायगड जिल्ह्यातील रेतीमाफियांवर जिल्हा खनिकर्म विभागाने वक्रदृष्टी करून ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रेतीमाफियांवर जिल्हा खनिकर्म विभागाने वक्रदृष्टी करून ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासंदर्भात १९ गुन्हे दाखल करताना २६ आरोपींना अटक करण्यात आली, तर ३५ वाहने जप्त करण्यात आली होती. रेतीचे अवैध उत्खनन करणाºयांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाकडून धाडी टाकण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा खनिकर्म विभागाच्या प्रमुख महिला अधिकारी अफरोज बेग यांनी दिला आहे.सरकारची रॉयल्टी बुडवून नैसर्गिक साधन संपत्तीची विल्हेवाट लावणाºयांवर कारवाईचा आसूड ओढण्यात येणार आहे.जिल्ह्यातील उरण, पनवेल, खालापूर या तालुक्यांमध्ये विकासकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे लगतच्या नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातही विकास सुरू आहे. त्यामुळे बांधकामासाठी लागणारी रेती ही रायगड जिल्ह्यातून पुरवली जाते. जिल्ह्यमध्ये हे रॅकेट मोठे असल्याने बोलले जात आहे. आधीही विविध अधिकाºयांना रेतीमाफियांकडून मारहाण, अंगावर वाहन नेणे, काही अधिकाºयांना तर गन पॉइंटवरही घेतल्याची उदाहरणे जिल्ह्यात घडली आहेत. त्याचप्रमाणे रेती उत्खनन करणाºयांमध्ये मतभेद होऊन वाद झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.जिल्हा खनिकर्म विभागाने रेतीचा लिलाव पुकारला होता मात्र त्याला प्रतिसादच आला नाही.अवैध रेती उत्खननाने सरकारला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचीही लूट होत आहे, असे बेग यांनी सांगितले. पारंपरिक पध्दतीने रेती उत्खनन करणाºयांसाठी प्रशासनाने रीतसर परवानगी दिलेली आहे. त्यामध्ये तळा आणि रोहा तालुक्याचा समावेश आहे. तेथे प्रत्येकी ६०० ब्रासची परवानगी देण्यात आल्याचे बेग यांनी सांगितले.२०१७-१८ या कालावधीत ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. १९ गुन्हे दाखल करताना २६ आरोपींना अटकही करण्यात आली, तर ३५ वाहने जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये महाड तालुक्यातील सर्वाधिक १६ प्रकरणांचा समावेश आहे. त्यामध्ये १२ लाख ३२ हजार ६२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तीन गुन्हे दाखल केले होते. दोन बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या, तर तीन संक्शन पंप नदीच्या पाण्यात बुडवण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.