शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाचे प्रतीक; अलिबागची ग्रामदेवता काळंबा देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:32 IST

आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे.

- जयंत धुळपअलिबाग : आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची असीम श्रद्धा असलेली आणि आंग्रे घराण्याची कुलदेवता काळंबा देवी ही अलिबागकरांची रक्षणकर्ती असल्याची पूर्वापार श्रद्धा येथे आहे.काळंबादेवीचा रोचक इतिहास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी उलगडला. मूळ काळंबादेवी हिराकोट किल्ल्यामध्ये होती. ब्रिटिश राजवट अलिबागमध्ये आल्यावर या किल्ल्याचे रूपांतर कारागृहात झाले. तेव्हा देवीच्या पूजा, उत्सव, दर्शनाच्या निमित्ताने मराठ्यांचा किल्ल्यात वावर नको, या हेतूने ब्रिटिशांनी किल्ल्यातील काळंबादेवीची शिळा किल्ल्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.थळच्या समुद्रातून आली काळंबादेवीदेवीने दृष्टांत देवून मी थळजवळच्या समुद्रात असल्याचा दृष्टांत दिला. तत्कालीन कोळी बांधवांनी समुद्रात शोध घेतला तेव्हा जाळ्यात काळंबादेवीची रेखीव पाषाणी मूर्ती सापडली. हिराकोट किल्ल्यातील देवीची शिळा आणि थळच्या समुद्रात सापडलेली काळंबादेवीची मूर्ती यांची अलिबाग शहराच्या तत्कालीन सीमेवर आणि आजच्या बालाजी नाक्यावर मंदिर बांधून सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी स्थापना केली.दूरदृष्टीचा एकात्मता संगमसरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी काळंबादेवीच्या मंदिराकरिता हीच जागा निवडण्यामागे मोठी दूरदृष्टी होती. अलिशाह दर्ग्याशेजारीच काळंबादेवीचे देऊळ झाले तर अलिबागमधील हिंदू आणि मुस्लीम बांधवांची नियमित भेट होईल, संवाद होईल आणि धार्मिक एकोपा निर्माण होईल, अशी त्यामागची कल्पना होती. जी खऱ्या अर्थाने वास्तवात उतरून अलिशाह दर्गा आणि काळंबादेवीचा हा बालाजी नाका अलिबागमधील हिंदू-मुस्लीम बांधवांचा गेल्या कित्येक पिढ्यांचा एकात्मतेच्या संगमाचा नाका बनला आहे.काळंबा देवीचा नवरात्रौत्सवअलिबाग सीमेवरील काळंबादेवीच्या चारही बाजूने अलिबाग शहर विस्तारत गेले. आंग्रे सरकारच्या काळात सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी मंदिरास इनाम दिले आणि त्यातून मंदिराचे कामकाज सुव्यवस्थित चालत असे. क्रमवंत हे त्याकाळी मंदिराचे मुख्य उपाध्याय होते तर त्यांच्या हाताखाली रामनाथ येथील गुरवांची नियुक्ती करण्यात आली होती. आजही गुरव परंपरा अखंड सुरू असून त्यांच्या माध्यमातून नवरात्रीत मंदिरात घटस्थापना करण्यात येते.

टॅग्स :Navratriनवरात्री