शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी संशयित बोट किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तात्काळ कळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 06:49 IST

सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे.

आगरदांडा : सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे. आपल्या देशावर हल्ले झाले, ते समुद्र मार्गे झाले आहेत, ते पुन्हा होऊ नये त्याकरिता समुद्रकिनारी सुरक्षारक्षकांनी व स्थानिक नागरिकांनी लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले.रायगड जिल्ह्याला सुमारे १७५ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने हा जिल्हा सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्याकरिता सागरी सुरक्षिततेकरिता सागर रक्षक दलाचे सदस्य, मच्छीमार बांधव व एकत्रितपणे प्रभावी काम करण्यासाठी मुरुड पोलीस ठाण्याच्यावतीने काशीद येथे सागर सुरक्षारक्षक सदस्य मेळावा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी साळे बोलत होते. मच्छीमारांनी योग्य चॅनेलचाच वापर करा. सर्र्वांनी जागृत रहा, समुद्रात मच्छीमारी करताना कोणतीही संशयित बोट आढळली तर तात्काळ माहिती देणे. मच्छीमारांनी आपल्या बोटीची कागदपत्रे बोटीमध्ये ठेवावेत असे यावेळी नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान यांनी मच्छीमार बांधवांना सांगितले.ओएनजीसी अधिकारी स्वप्निल म्हात्रे यांनी ओएनजीसीकडून समुद्रालगत असलेल्या गावांना शौचालय बांधणे, शाळेला मदत अशा प्रकारच्या मदत केली जाईल असे स्पष्ट के ले.मच्छीमार बांधव प्रसाद आंबटकर यांनी आम्हाला स्मार्ट कार्ड द्यावेत अशी सूचना केली.कारण आधारकार्ड चेकिंगकरिता नेव्ही अधिकारी यांनी मशीन ठेवाव्यात जेणे करून भारतीय नागरिक असल्याचे तात्काळ ओळखले जावू शकते. परंतु असे न करता आम्हा मच्छीमारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.यावेळी पोलीस निरीक्षक किशोर साळे, सरपंच नम्रता कासार, नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान,ओएनजीसी अधिकारी स्वप्निल ठाकूर , पोलीस हवालदार विश्वनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे, मेरीटाईम बोर्डचे अधिकारी राहुल होले आदी उपस्थित होते.