शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जीवरक्षकांनी वाचवले सात जणांचे प्राण, गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:24 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी उभ्या असलेल्या दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांना समजले. त्यांनी तत्काळ समुद्रकिनाºयावर हजर असलेल्या जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर यांना सांगितले. त्यावर या तिघांनीही कोणताही विचार न करता बुडत असलेल्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले. जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर या तिघांचेही सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन हे काही वर्षांपासून दिवेअगार कोळीवाडा भागातील समुद्रकिनारी करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन सुरक्षित पार पडल्यानंतर गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी ५ नंतर बोर्ली पंचतन येथून जवळपास ५०० गणेशमूर्ती दिवेआगर समुद्रकिनारी पोहचल्या. मागील काही दिवस पावसाने कहर केल्याने समुद्रामध्ये वादळाचे वातावरण होते. गणेश विसर्जनाच्या वेळी देखील समुद्र थोडा खवळलेल्या स्थितीमध्ये होता. येथील स्थानिक मच्छीमारांच्या अंदाजानुसार समुद्र शांत झालेला नसल्याचे सांगण्यात आले. विसर्जनस्थळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.बोर्ली पंचतन येथे गणपतीचे समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी संदेश म्हसकर, दिनेश म्हसकर, केशव गायकर, ओमकार गायकर, यशवंत गायकर, गजानन गायकर, विनोद धनावडे असे सात जण गेले. समुद्राच्या आलेल्या लाटेने त्यांना आत खेचून घेतले व त्यांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली . हे पाहून दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कृष्णा जागडे व उपस्थित काहींनी तत्काळ समुद्रकिनारी असणाºया प्रीतम भुसाणे या जीवरक्षकास व सागरी रक्षक मनोहर गोपाळ रघुवीर व लाया लखमा चोगले यांना बोलाविले. यांनी क्षणात आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याचा अंदाज घेत सर्व सात जणांना सुरक्षित बाहेर काढले. संदेश म्हसकर व दिनेश म्हसकर यांना डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.गणपती विसर्जन घाटाची दुरवस्थाबोर्ली पंचतन येथील छोट्या नदीवर गणेश विसर्जन करण्यात येत असे. यासाठी ग्रामपंचायतीच्या निधीमधून गणपती विसर्जन घाट देखील बांधण्यात आला आहे, परंतु विसर्जन घाट नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माती साचल्याने व तेथील पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने याठिकाणी गणेश विसर्जन कसे होणार या कारणामुळे बोर्ली पंचतन येथील सर्व गणपतींचे विसर्जन नजीकच्या काही वर्षांपासून २ किलोमीटरवर असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी करण्यात येत आहे.यासाठी ग्रामपंचायत देखील मूर्ती वाहून नेण्यासाठी गाड्या उपलब्ध करते, तसेच गणेशभक्त देखील विसर्जन चांगल्या पध्दतीने होण्यासाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत खर्च करीत गणेशमूर्तींसह दिवेआगरचा किनारा गाठतात. बोर्ली पंचतन येथील विसर्जन घाट सुशोभित व गणेश विसर्जनासाठी चांगला तयार केला असता तर बोर्लीकरांना दिवेआगर येथे विसर्जनासाठी जाण्याचे कारणच नव्हते व जर सात जणांचे यात काही बरेवाईट झाले असते तर त्यास जबाबदार कोण होते, अशा निराशाजनक प्रतिक्रि या उमटत आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव