शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

लाटांनी ओलांडला संरक्षण बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:28 IST

१२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता.

अलिबाग : १२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता. शनिवारी रायगड जिल्ह्याच्या किनारीभागात उधाण भरती आली. मोठ्या लाटांमुळे अलिबागमधील समुद्र संरक्षक बंधारा ओलांडून पाणी जेएसएम कॉलेजच्या मैदानापर्यंत आले होते.पर्यटक आणि अलिबाग शहरवासीयांनी मोठ्या लाटांचा थरार अनुभवण्याकरिता समुद्रकिनारी गर्दी केली होती. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील रेवस, बोडणी आणि खारेपाटातील शहापूर, धेरंड गावांच्या हद्दीतदेखील समुद्र व खाडीचे पाणी शिरले होते; परंतु कोठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही.अलिबाग समुद्रकिनारी कुलाबा किल्ल्यासमोर पाण्याचा रंग गढूळ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर लाटांचा वेगही जास्त होता. पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचे जीवरक्षक समुद्रकिनारी कार्यरत होते. शुक्रवारी रात्री जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा समुद्राच्या मोठ्या लाटांशी कोणताही संबंध नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.आगामी तीन दिवस म्हणजे १५ ते १७ जुलैपर्यंत समुद्रात ४.९७ मीटर उंचीच्या लाटा येण्याचा इशार भारतीय हवामान विभागाने पूर्वीच दिला असल्याने जिल्ह्यातील किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.>मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नयेरायगड पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किनारी भागातील सर्व गावांमध्ये कार्यरत सागर रक्षक दलाच्या सदस्यांनाही समुद्रभरतीच्या वेळी सतर्क राहण्याकरिता सूचित करण्यात आले आहे.समुद्र खवळलेल्या असल्याने कोळी बांधवांनी मच्छीमारीकरिता समुद्रात जाऊ नये, असा इशारा मत्स्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.>पावसाच्या उघडीपमुळे उधाण आले नाहीरेवदंडा : किनारपट्टीवर उधाणाचा फटका स्थानिकांना बसू शकतो, अशी स्थिती असताना रेवदंडा, थेंराडा किनारपट्टीवर कुठेही उधाणाने पाण्याची पातळी वाढली किंवा पाणी घरात शिरणे, शेतीचे बांध फुटले, असा प्रकार झाला नाही. उधाणाचे पाणी आले नाही त्याचे कारण पावसाने पूर्णपणे घेतलेली उघडीप हे आहे, असे मत जाणकार नागरिक थेंरोडा-आगल्याचीवाडीमधील हेमंत खंडेराव यांनी सांगितले.>उधाणामुळे पाण्याची पातळी वाढलीकार्लेखिंड : आलिबाग तालुक्याला जवळ जवळ ५० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यालगत गावांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या उधाणाचा इशारा दिल्याने किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेवस, मांडवा, बोडणी, सासवणे हा किनारा वळणाचा असल्यामुळे शनिवारी या ठिकाणी पाण्याला जोर असतो. उधाणाच्या भरतीने रेवस, बोडणी दरम्यान सारळ पूल या रस्त्यावरून पाणी गेले.उधाणाची भरती ही या वर्षातील सर्वात मोठी भरती होती. ४.९७ मीटर एवढे पाणी वाढले होते, अशी माहिती येथील मच्छीमारी व्यवसाय करणारे रूपेश नाखवा यांनी दिली. मच्छीमारी बंद असल्यामुळे कोणही कोळी बांधव समुद्रामध्ये गेलेले नाहीत, अशी माहिती मच्छीमार सोसायटी, बोडणीचे चेअरमन विश्वास नाखवा यांनी दिली. तसेच किनाºयावरील माणकुले गावात नेहमी पाणी शिरते; परंतु रस्त्याच्या बांधकाम आणि भरावामुळे गावात पाणी शिरले नाही. सरकारी सूचना तसेच माहितीमुळे जीवितहानी झालेली नाही.