शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:48 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जयंत फेगडे यांनी जिल्हा न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपल्या कैफियतीत नमूद केला.

जयंत धुळप ।अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जयंत फेगडे यांनी जिल्हा न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपल्या कैफियतीत नमूद केला. याबाबतचीमाहिती गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील सर्व रस्त्याच्या धोकादायक परिस्थितीबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करणारे अ‍ॅड. अजय उपाध्ये यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून राज्याच्या विधिमंडळापर्यंत गोवा राष्ट्रीय महामार्गाची पळस्पे(पनवेल) ते इंदापूर या टप्प्याची झालेली दुरवस्था सध्या चिंतेचा विषय आहे. दररोज किमान चार ते पाच वाहन अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी १५ आॅगस्टपूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवून तो बिनधोक केला जाईल असे आश्वासन विधिमंडळाच्या अधिवेशनात दिलेले असताना, हा महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक असल्याचा दावा करणे अत्यंत क्लेशदायक असल्याचे अ‍ॅड.उपाध्ये यांनी सांगितले.महामार्गासह जिल्ह्यातील राज्य मार्गांच्या धोकादायक परिस्थितीबाबत अ‍ॅड.उपाध्ये यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एन.बी.लवटे यांच्या न्यायालयासमोर सुरु आहे. रस्त्याच्या दुरवस्थेस जबाबदार रायगड जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे पगार थांबविण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेत त्यांनी केली आहे.याचिकेची पुढील सुनावणी २८ आॅगस्टला-दाखल कैफियतीअंती अ‍ॅड. उपाध्ये यांनी, गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या गंभीर दुरवस्थेची प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पाहणी करण्याकरिता न्यायालयाने ‘कोर्ट कमिशनर’ची नियुक्ती करावी असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. हा विनंती अर्ज न्यायालयाने मंजूर केला तर नॅशनल हायवे विभागाचाचालू असलेला चुकीच्या पध्दतीचा कारभार समोर येवू शकणार आहे. रस्त्यांची वस्तुस्थिती, तसेच रस्त्याची गुणवत्ता, खड्डे इत्यादीबाबत सखोल माहिती स्पष्ट होवू शकेल असा विश्वास अ‍ॅड.उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे. या याचिकेची पुढील सुनावणी २८ आॅगस्ट रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.