शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: November 22, 2015 00:33 IST

तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने तालुक्यातील भातमळणी करणाऱ्यांची दाणादाण उडाली असून, अचानक जोरदार कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या

पोलादपूर : तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने तालुक्यातील भातमळणी करणाऱ्यांची दाणादाण उडाली असून, अचानक जोरदार कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या भाताच्या मळणीवर पावसाच शिडकावा होऊन भाताच्या मळणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.श्रीवर्धन तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतीची कापणी होऊन काही शेतकऱ्यांनी भाऱ्याची उडवी शेतावर रचून ठेवली होती. तर काहींनी गुरांसाठी लागणारे पेठे ठेवले होते. परंतु अचानक पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची एकच ताराबंळ उडाली. काही शेतकऱ्यांची मळणी चालू असून, भात पूर्णपणे भिजून गेला आहे. वर्षभर शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येणार, तोच अवकाळी पावसाने त्यावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वीटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळा संपून आता हिवाळा लागला असला तरी दिवसाचे तापमान कमी व्हायचे नाव घेत नाही. तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंशापर्यंत पोहोचत असल्याने हिवाळ्यात उकाड्याबरोबर उन्हाचे चटके बसत आहेत. मात्र आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर रस्त्यावरसुद्धा पाणीच पाणी दिसू लागले. पनवेल- सायन महामार्गावर कळंबोली, कामोठे आणि कोपरा टोलनाका परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे वाहने चालविण्यास चालकांना कसरत करावी लागत होती. त्याचबरोबर पनवेल शहरात उड्डाणपुलाखाली अमरधाम स्मशानभूमीजवळ महामार्गावर पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे पादचारी, दुचाकीस्वारांची त्रेधातिरपीट उडाली. छत्र्या, रेनकोट नसल्याने अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा पावसाळ्याप्रमाणे आनंद लुटला. कळंबोली सर्कल आणि पनवेल शहरालगतच्या पुलाखाली अनेक जण पाऊस उघडण्याची वाट पाहात होते. मात्र संध्याकाळपर्यंत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पावसात भिजत जाणे कित्येकांनी पसंत केले. तिसरा शनिवार असल्याने कार्यालयीन कामकाज सुरू होते. संध्याकाळी चाकरमान्यांना घरी जाण्याकरिता उशीर झाला. द्रुतगती महामार्गावरसुद्धा वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. त्याचबरोबर हर्बर लाइनवरील लोकल सेवा नेहमीपेक्षा स्लो झाली.