शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

खाकी वर्दीची अशीही सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:14 IST

हरवलेल्या मुलाचा शोध : दिघी सागरी पोलिसांनी घडवली मायलेकाची भेट

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी हरवलेल्या मुलाची काही तासांतच त्याच्या आईशी भेट घडवून दिली आहे.कार्ले अदिवासीवाडीवरील राहणाऱ्या सुगंधा सूर्यकांत हिलम या दिवेआगर नजीक आंबा बागायतीत नोकरी करत आहेत. त्या बुधवारी खरेदीसाठी सकाळी १० वा. दरम्यान बोर्लीपंचतन येथे गेल्या असताना घरी परतल्यावर आपला अडीच वर्षांचा मुलगा सौगंध सूर्यकांत हिलम नसल्याने घाबरून गेल्या. रोजगार मिळवण्यासाठी भटकंती करणाºया आदिवासी कुटुंबातील मुलगा अचानक हरवला. शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने सुगंधा यांनी पोलीस ठाणे गाठले.

दिघी सागरी पोलिसांकडे याची तक्रार येताच सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार संतोष जाधव, तसेच गस्तीवरील स्टाफ पो. ना. विनायक पाटील, के. एन. बठारे, पो.शि. ए. ए. सावंत यांना तत्काळ सूचना मिळताच श्रीवर्धन-शेखाडी रस्त्याला शोध सुरू केला. भरडखोल गावापुढे शोध घेत असताना शेखाडी येथे चौकशी दरम्यान दाम्पत्याकडून माहिती मिळाली व मुलाचा शोध लागला. विचारणा केली असता रडून गोंधळलेल्या मुलाला पत्ता काही सांगता येईना. त्याला भरडखोल येथे आणण्यात आले.

पोलिसांनी आईची व मुलाची ओळख पटवून काही तासांतच मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. खेळता खेळता मुलगा वाट हरवला होता. दिघी सागरी पोलिसांच्या या माणुसकीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.