शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

फुलांच्या शेतीतून शोधली स्वयंरोजगाराची यशस्वी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:13 IST

मुरूड तालुक्यातील रामदास पाष्टे यांचे यश

राजीव नेवासेकर लोकमत न्यूज नेटवर्कबोर्ली-मांडला : मुरूड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील काजूवाडी येथील शेतकरी रामदास पांडुरंग पाष्टे यांनी परिस्थितीवर मात करून शेतात तीन गुंठे क्षेत्रात फुलांची शेती फुलवून स्वयंरोजगाराची यशस्वी वाट शोधली आहे. यासाठी त्यांंचे कौतुक होत आहे. तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दुर्गम भागात रामदास पाष्टे यांनी फणसाड धरणाच्या जवळ काजूवाडीतील आपल्या शेतातील  तीन गुंठे क्षेत्रात झेंडू (गोंड्याची) फुलांची व तीन गुंठे जमिनीत शेवंती पिकविली असून, तीन गुंठ्यांत मका, एका गुंठ्यात भुईमूग व एक गुंठ्यात रताळीचे पीक घेतले आहे. त्यांनी २०१६ मधे अलिबाग-वाडगाव येथील नातेवाईक महादेव पाष्टे यांच्याकडून शेवंतीची तीनशे रोपे आणून लावली होती. २०१७ मध्ये नंतर एक गुंठ्यात रोपे लावली. हीच रोपे जागेत तयार करून यंदा तीन गुंठ्यांत रोपे लावण्यात आली आहेत. या रोपांची लागवड सरासरी ऑगस्ट महिन्यात केली जाते व डिसेंबर महिन्यात उत्पन्न मिळते. यंदा फुलशेती बहरली; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, तीन जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे फळभाजीपाला व्यवसायावर परिणाम झाला आहे. चांगली मशागत व मेहनत यामुळे चांगले उत्पादन मिळविले आहे. त्यांनी तीन गुंठे जागेत शेवंतीची व तीन गुंठे झेंडूची (गोंड्याची) तीन गुंठे मका लावला. एक गुंठे जागेत भुईमूग तर एक गुंठ्यात रताळी लावली आहे. तीन महिन्यांनंतर त्यांना दिवसाकाठी चांगल्याप्रकारे रोजगार मिळाला आहे. शेतात फळभाजीपाला पीक घेताना त्यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर न करता यासाठी शेतातच ६×१० चा खड्डा तयार करून त्यात पालापाचोळा व शेणाचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले. परिणामी दोन महिन्यांनंतर फुलांच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. 

बागायतदार शेतकऱ्यांनी नारळ, सुपारी, आंबा पिकाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात फुले, कांदा, मका व रताळी लागवड करून अंतर्गत पीक घेतल्यास स्वयंरोजगाराची वाट खुली होऊ शकते. - रामदास पाष्टे, शेतकरी