शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग; महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड फळ असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 01:42 IST

पनवेलमध्ये पिकलेली ही स्ट्रॉबेरीची फळे महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड असल्याचा दावाही पवार यांनी केला आहे.

वैभव गायकर पनवेल : स्ट्रॉबेरी म्हटले की साहजिकच महाबळेश्वरचे नाव सर्वांसमोर येते. मात्र पनवेल तालुक्यातील शेतकऱ्याने पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

वावंजे गावातील सज्जन पवार यांनी हा प्रयोग वावंजे परिसरातील श्रीमलंग गड डोंगराच्या पायथ्याशी ७ गुंठे जागेत राबविला आहे. पनवेलमध्ये खांदेश्वरमध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनात महाड येथील शेतकऱ्याने हा प्रयोग राबविल्याची माहिती शेतकरी सज्जन पवार यांना मिळाली होती. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेऊन पनवेलमध्ये आपल्या शेतात हा प्रयोग राबविण्याचे निश्चित केले. याकरिता जागेची मशागत करून स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी आवश्यक असलेले मलचिंग बेड (गादीवाफे) तयार केले. याकरिता उभ्या आडव्या पद्धतीने २५ मायक्रॉनचे मलचिंग पेपर लावले. परदेशातून भारतात आलेली स्ट्रॉबेरीची शेती महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहूनच सज्जन यांनी १ हजार रोपे पनवेलमध्ये आणली. विंटर डॉन आणि स्वीट चार्ली या जातीची ही रोपे आहेत. महाबळेश्वरला सात रुपये प्रति रोप प्रमाणे हे स्ट्रॉबेरीचे रोप पवार यांना मिळाले. नोव्हेंबरमध्ये त्यांनी या रोपांची लागवड केली. दरम्यान, दोन वेळा अवकाळी पाऊस पडूनही स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी झाल्याने पनवेलकरांना स्ट्रॉबेरी चाखायला मिळणार आहे. श्रीमलंग गड परिसरात वातावरण थंड असल्याने येथील वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याचे सिद्ध झाल्याने भविष्यात पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकते. पनवेलमध्ये पिकलेली ही स्ट्रॉबेरीची फळे महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड असल्याचा दावाही पवार यांनी केला आहे.

१५ दिवसांत फळे पिकल्यावर काढणी

स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि १०-२५ अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते. परदेशातून आयात केलेल्या (कॅलिफोर्निया) जातींना सरासरी ३० ते ३७ अंश सेल्सिअस तापमान, ६० ते ७० टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश चांगले मानवते. १५ ते २० दिवसांत फळे पिकल्यावर त्यांची काढणी केली जाईल. 

पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी झाल्याने मी खूप आनंदित आहे. शेतकऱ्याने प्रयोगशील असावे या हेतूने मी हा प्रयोग राबविला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने पनवेलमध्येदेखील स्ट्रॉबेरी पिकू शकते हे सिद्ध झाले आहे. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीदेखील हा प्रयोग राबवावा. - सज्जन पवार, शेतकरी,वावंजा गाव 

 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान