शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

रस्त्याअभावी विद्यार्थ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:27 IST

भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे उलटली. मात्र, दऱ्या-खो-यात, डोंगरकडा-कपारीत वसलेली गावे आजही रस्ते, शाळा, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आजही पाहायला मिळत आहे.

- गिरीश गोरेगावकर माणगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे उलटली. मात्र, दऱ्या-खो-यात, डोंगरकडा-कपारीत वसलेली गावे आजही रस्ते, शाळा, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आजही पाहायला मिळत आहे. माणगाव-महाड तालुक्याच्या वेशीवर वसलेल्या उंबरी व आजूबाजूच्या जवळपास पाच ते सहा वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना डोंगरदºयांतून दररोज तीन-चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. बाजारहाट करणे असो वा गावात दूध पोहोचणे, वाहतुकीचे कोणतेच साधन नसल्याने ग्रामस्थांना पायपीट करीतच माणगाव गाठावे लागते.माणगाव तालुक्यातील उंबरी नेराव हे गाव खर्डी खुर्द या गावापासून कमीत कमी तीन ते चार किलोमीटर लांब असून, गावातील पायवाट जंगलातून आहे. उंबरी नेराव येथील नागरिकांना प्रत्येक कामासाठी व व्यवसायासाठी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना माणगाव गाठावे लागते; परंतु हा मार्ग अत्यंत खडतर आहे. डोंगराळ भागातील पाच ते सहा गावांतील लोकसंख्या साधारण चार ते पाच हजारांच्या सुमारास आहे; परंतु या गावांना माणगावपर्यंत येण्यासाठी गेल्या ७२ वर्षांत रस्ता झालेला नाही. निवडणुकांवेळी राजकीय मंडळी समस्या सोडविण्याचे आश्वासन देतात. मात्र, निवडणूक झाली की गावांकडे पाठ फिरवत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. माणगाव तालुक्यातील डोंगरभागातील गावांमध्ये किमान मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.>शाळेत जाण्यासाठी तासभर पायपीटगेली २५ ते ३० वर्षे या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्ते, पाणी आदी मूलभूत सुविधांसाठी अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्याने जाण्यासाठी कोणतेही वाहन सोडा; परंतु पायी चालत जाणेही जिकरीचे झाले आहे.शाळेत जाण्यासाठी सकाळी ५ वाजता उठावे लागते. त्यानंतर डोंगरातून एक तास चालत जाऊन शाळेत जावे लागते. संध्याकाळी उशिरा घरात आल्यावर आम्ही थकलेलो असतो, त्यामुळे अभ्यास करायला वेळ मिळत नसल्याचे गावातील शालेय विद्यार्थी सांगतात.उंबरी-नेराव या पाच ते सहा वाड्यांमधील मुलांना या परिस्थितीमुळे लग्नासाठी कोणीही मुलगी देण्यास अथवा सोयरिक करण्यास धजावत नाही.जगण्यासाठी करावा लागतो संघर्षडोंगरभागात अनेक हिंसक प्राणी आहेत, त्यांचा सामना करावा लागतो. एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला बांबूच्या झापामध्ये डोली करून संपूर्ण डोंगर त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन खाली उतरावे लागते. एखादा आजारी रु ग्ण अथवा गरोदर महिलेला या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला, तरी ती व्यक्ती घरी सुखरूप परत येईल, याची शाश्वती नाही, त्यामुळे जीवावर उदार होऊन आपले काम व विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्याकरिता दररोज तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या ७२ वर्षांत कोणत्याही मंत्र्याला अथवा नेत्याला आमची अडचण दूर करता आली नाही; त्यामुळे यापुढे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नेत्याला व मंत्र्याला या पाच ते सहा गावांत पाऊल टाकू देणार नाही. आमच्या मूलभूत हक्कासाठी लहान मुलाबाळांसह आमरण उपोषणही करण्यासही मागे राहणार नाही, अशा परखड भाषेत ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर निषेध केला. खर्डी खुर्द ते उंबरी-नेराव या रस्त्याला शिवकालीन इतिहास असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हा रस्ता आहे. खर्डी खुर्द ते उंबरी-नेरावपासून रायगड फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता झाल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल, त्यासाठी या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनी अगदी मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतसुद्धा पाठपुरावा केला; त्यामध्ये वनविभाग खातेही यासाठी मंजुरी देत नाही.>दु:ख एवढेच होतेय की, आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनही नेराव, सुतारवाडी, उबंरी, उन्ड्रे वाडी व बनगेवाडीसाठी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली नाही. तरी आम्ही ग्रामस्थ आपल्या प्रसारमाध्यमांद्वारे सरकारला जाब विचारतोय, तसेच याबाबत आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. तसेच येथील दुग्ध व्यवसाय मोठा असून, रोज २०० ते २५० लिटर दूध माणगावपर्यंत या रस्त्यामुळे पोहोचविणे अवघड होत असून, या शालेय विद्यार्थ्यांना ही वाट चालताना खूप शारीरिक हाल सहन करावे लागत आहेत.- सुनील कोरपे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, नेराव