शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाडीतील चिमुकल्यांचा लेणी संवर्धनासाठी पुढाकार, स्वच्छता मोहिमेतून घेतली प्राचीन नेणवली लेण्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:01 IST

students of Dhangarwadi : महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. हे सभागृह २१ मीटर बाय १६ मीटर एवढे विशाल आयताकृती आहे. भिंतीत एकूण १७ खोल्या खोदलेल्या आहेत. 

पाली : सुधागड तालुक्यातील राजीप कोंडी धनगरवाडी शाळेतर्फे नेणवली येथील प्राचीन लेण्यांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या वेळी चिमुकल्यांनी प्राचीन नेणवली लेण्यांची माहिती घेऊन संवर्धनासाठी पुढाकार घेतला. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. सर्वांनी मिळून लेणी, सभागृह, स्तूप व सभोवतालचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर राजेंद्र खैरे यांनी मुलांना लेण्यांची माहिती दिली व त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व सांगितले.

सुधागड तालुक्यातील प्राचीन नेणवली लेणी, २१ लेण्यांचा समूह; काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाहीखडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्री पर्वतात नेणवली लेण्या आहेत. लेण्यांचा मार्ग या दोन्ही गावांपासून खरबाच्या वाटेने घनदाट अशा डोंगरांमध्ये जातो. लेणी गावापासून साधारण अडीच किमी अंतरावर आहेत. कोंडी धनगरवाडी गावातूनदेखील लेण्यांवर पोहोचता येते. अतिशय दुर्गम असलेल्या या लेणी समूहात एकूण २१ लेण्या आहेत. लेण्यांतील सर्वात मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस असलेला घुमट दगडात कोरला आहे. घुमटचा व्यास १.५ मीटर, उंची ३.५ मीटर आहे. घुमटाच्या वर मध्यभागी झाकणासारखा आकार असून चौरसाकृती छिद्र आहे. स्थानिक लोक या घुमटाला रांजण म्हणतात. या लेण्यातील सभागृह सर्वात मोठे आहे.याचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. हे सभागृह २१ मीटर बाय १६ मीटर एवढे विशाल आयताकृती आहे. भिंतीत एकूण १७ खोल्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत दगडी ओटा आणि चौकोनी खिडकी आहे. काही खोल्या एकांतवासासाठी खोदल्या आहेत. सभागृहांमध्ये ठाणाळे लेण्यांप्रमाणे नक्षीकाम नाही किंवा लेण्याचा काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाही. 

आपल्या प्राचीन व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती मुलांना व्हावी, त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली होती. कारण हेच विद्यार्थी लेणी व ऐतिहासिक ठेव्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढे सरसावतील.- राजेंद्र खैरे, मुख्याध्यापक, कोंडी धनगरवाडी शाळा

टॅग्स :Raigadरायगड