शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळग्रस्तांना आजही वेचावे लागतात संसार; ३ जून रायगड जिल्ह्यासाठी ठरला काळा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 23:40 IST

३ जून रायगड जिल्ह्यासाठी ठरला काळा दिवस; अनेकांच्या डोळ्यात अजूनही पाणी

आविष्कार देसाईरायगड : एकीकडे जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असल्याने दिवसाला ५०० हून अधिक जणांना काेराेनाची लागण हाेत हाेती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण हाेते. जिल्ह्यात काेराेनाने शिरकाव करून तीनच महिने झाले असतानाच निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याला जबरदस्त तडाखा दिला. दाेन तासांमध्ये हाेत्याचे नव्हते झाले. लाखो घरे पत्त्याच्या घरांप्रमाणे काेलमडून पडली.

हजाराे विजेचे खांब, महाकाय वृक्ष, हजाराे हेक्टर शेतीचे नुकसान झाले. १५०० गावे अंधारात हरवली हाेती. अद्यापही जिल्हा निसर्गाच्या काेपातून म्हणावा तसा स्थिर झालेला नाही. राज्य सरकारची सुमारे ४०० काेटी रुपयांची आर्थिक मदत काही वादळग्रस्तांना तांत्रिक कारणांनी मिळणे बाकी आहे, तर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या २२५ काेटींपैकी एक दमडीही अद्याप वादळग्रस्तांच्या खात्यात जमा झालेली नाही.

३ जून २०२० हा दिवस रायगड जिल्ह्यासाठी ‘काळा दिवस’ ठरला. देशातील प्रगत तंत्रज्ञानामुळे काही दिवस आधी आपल्याला निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकाेपाचा कालावधी आणि काेठे धडकणार आहे याची माहिती मिळाल्याने जास्तीतजास्त मनुष्यहानी टाळणे सरकार आणि प्रशासनाला शक्य झाले. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टीला वादळ ३ जून राेजी धडकणार असल्याचे  भारतीय हवामान विभागाने सूचित केले हाेते.

तब्बल सव्वाशे वर्षांनी चक्रीवादळाने रायगडला पुन्हा एकदा जबरदस्त आघात केला आहे. निसर्ग चक्रीवादळ सुरुवातीला श्रीवर्धन हरिहरेश्वरला धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला हाेता. त्यानंतर काही तासांमध्ये ते अलिबागकडे कूच करीत असल्याची सूचना मिळाली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. तातडीने एनडीआरएफच्या दाेन तुकड्या अलिबागला बाेलवाव्या लागल्या. परंतु प्रत्यक्षात निसर्ग चक्रीवादळाने चकवा देत आपला विनाशकारी आघात मुरुड तालुक्यावर केला. तब्बल ११० किमीच्या वेगाने वारे वाहत हाेते. वादळ ज्या मुरुडमध्ये धडकले तेथील ६० किमीच्या परिघामध्ये वादळाने आपल्या अस्तित्वाची विनाशकारी छाप साेडली. 

अलिबाग, मुरुड, पेण, राेहे, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या सात तालक्यासह तळा, पाेलादपूर, सुधागड, महाड, खालापूर, कर्जत, उरण, पनवेल तालुक्यातील हजाराे घरे पत्यांच्या बंगल्याप्रमाणे काेलमडून जमिनदाेस्त झाली. घरांचे पत्रे, घरांचे छप्पर कापसासारखे वादळात फुरर्र्कन उडून गेले. दाेन तासांच्या वादळी तांडवामुळे विजेचे पाेल जमिनीतून उखडून खाली काेसळले. विजेच्या तारांवर महाकाय वृक्ष पडल्याने त्या जमिनीवर लाेंबकळत हाेते. साेसाट्यांचा वारा आणि साेबतीला जाेरदार पावसांच्या सरीमुळे निसर्गाच्या राैद्ररुपाचे दर्शन आजही अंगावर काटा आणणारेच हाेते. वादळाच्या तडाख्यात काही ठिकाणी शाळांच्या इमारतीही पडल्याने लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड

जिल्ह्यात एकूण एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड झाली, तर १४ हजार ७०५ विजेचे पाेल, तारा पडल्या हाेत्या. १९०५ गावांमध्ये लाइट गेली हाेती, पैकी ३१६ गावांमध्ये तातडीने वीज सुरळीतपणे सुरू करण्यात प्रशासनाला यश आले हाेते. मात्र १५८९ उर्वरित गावे आठवडाभर अधिक काळ अंधारातच चाचपडत हाेती. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, तळा या तालुक्यातील काही गावांची वीज पूर्ववत हाेण्यासाठी तब्बल दाेन महिन्यांचा कालावधी लागला हाेता.

घरांचे नुकसान

दाेन तासांच्या महाभयानक नाट्यानंतर नागरिक प्रचंड दहशतीखाली हाेते. त्यांनी घराबाहेर पडत वादळाने आणलेला प्रलय आपल्या उघड्या डाेळ्यांनी पाहिला. काेणाच्या घरांचे छप्पर उडाले हाेते, तर काेणाची घरे जमीनदाेस्त झाली हाेती. गाेठे पडून पावसाच्या पाण्यात वाहून गेले हाेते.  काहींनी तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावल्याने त्यांच्या अश्रूंचा बांध धरण फुटल्याप्रमाणे वाहत हाेता. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला हाेता. वादळामुळे घरातील सामानाची प्रचंड हानी झाली.

प्रशासनाने केली मदत

वादळानंतर संसार वेचण्यासाठी नागरिक सैरावैरा धावत हाेते. जमीनदाेस्त झालेला संसार पुन्हा उभा करणे हे त्यांच्या समाेर फार माेठे आव्हान हाेते. सर्वसामान्यांचे उद्योगधंदे, व्यवसाय वादळामुळे बंद पडले. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने चुलीच पेटवता आल्या नाहीत. सरकार मदतीचा माणुसकीचा हात देईल अशी आशा त्यांना लागली हाेती. वादळाच्या भयाण शांततेनंतर काही कालावधीतच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्याला सुरुवात केली. 

वीज नसल्याने झाले हाल

वीज गेल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची चांगलीच दमछाक झाली हाेती. शहरे आणि निमशहरांमध्ये साेसायट्यांनी जनरेट भाड्याने आणून पाणी इमारतीवरील टाकीत साेडून आपली गरज भागवली. त्यामुळे तेथील प्रश्न मिटला, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांची सर्वाधिक फरफट झाल्याने ते मेटाकुटीला आले हाेते. लाइट नसल्याने माेबाइल बंद, माेबाइल टाॅवरही बंद असल्याने संपर्क साधण्यासाठी नागरिकांना प्रचंड अडचणींना सामाेरे जावे लागले. 

टॅग्स :Raigadरायगड