शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान, वीजपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 02:13 IST

मुरुड, खालापूर, कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नागरिकांचे नुकसान झाले आहे.

नेरळ : रायगडमध्ये ठिकठिकाणी वादळी पावसासह आलेल्या वाºयाने मोठे नुकसान केले आहे. मुरुड, खालापूर, कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नागरिकांचे नुकसान झाले आहे.कर्जत तालुक्यातील कशेळे, पाथरज आणि सावळे भागात बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि सोसायट्याच्या वाºयात अनेक घरांचे पत्रे उडाले असून विजेचे खांब वाकले आहेत. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले असून दीड महिना कोणतेही कमाईचे साधन नसलेल्या नागरिकांवर आता दुसरे मोठे संकट उभे राहिले आहे. तर विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यातआला आहे.कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या कशेळे, सावळे आणि पाथरज भागात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवकाळीपासून आणि वादळी वाºयात अनेक घरांचे पत्रे उडाली आहेत. त्यात मोठे नुकसान झाले आहेत. कशेळे येथील एका दुकानाचे पत्रे उडाल्याने त्यातील सामानही पूर्ण भिजून गेले आहे. आवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त सावळे आणि पाथरज भागातील नागरिकांनी केली आहे.याचबरोबर मुरुड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.>रोहा-कोलाड रस्त्यावर कोसळले झाडधाटाव : बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह आलेल्या पावसामुळे रोहा-कोलाड रस्त्यावर रोठखुर्द, सुदर्शन नगरनजीक झाड रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडले. यामुळे कोलाड व रोहा बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. यामुळे कामगारांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अर्ध्या तासाने झाड बाजूला करण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.>खोपोलीत गारांसह पाऊसखोपोली : खोपोली व खालापूर तालुक्यात आज सायंकाळी वादळी वाºयासह पडलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. गारांसह सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरांवरचे, शाळांवरचे पत्रे उडाले असून काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसाने काही काळ सुखद गारवा निर्माण झाल्याने गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या खोपोलीकरांना थोडासा दिलासा मिळाला.बुधवारी दुपारपासूनच अंधार झाल्यामुळे पाऊस पडणार, अशी शक्यता होती. ५:४५ वाजता पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा होता आणि गाराही मोठ्या प्रमाणात पडल्या. लौजी येथे डॉक्टर गुप्ता यांच्या कारवर झाड पडल्याची घटना घडली. तसेच तेथील शाळेवरचे काही पत्रेही उडाले. तालुक्याच्या परिसरातही वादळी वारा आणि गारांसह पाऊस पडला. अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडून आढावा घेतलाजाणार आहे.