शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा म्हसळ्यातील शाळा, अंगणवाड्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:18 IST

निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या म्हसळा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

उदय कळस ।

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळात म्हसळा तालुक्यातील शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीची कौले, पत्रे उडाले, भिंती पडल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानात पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यत नुकसान झाले असून तालुक्यातील सुमारे ११० प्राथमिक शाळा, १०० माध्यमिक शाळा, ८० अंगणवाड्या आणि महाविद्यालये यांची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या म्हसळा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्याने अनेक शाळांच्या इमारतींचे पत्रे, कौले फुटली असून भिंती खचल्या आहेत. परिसरातील झाडे इमारतींवर पडल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. कमीत कमी ५० ते ६० हजारांपासून ४० ते ५० लाखांचे प्रत्येक इमारतीचे नुकसान झाले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना कोणत्या प्रकारे सुरू करावे, इमारतीच्याा डागडुजीचे काय? सरकरी मदत कशा प्रकारे मिळेल? इमारत दुरुस्तीपर्यंत शाळांचे काय, असे अनेक प्रश्न शाळा व्यवस्थापनास पडले आहेत. वादळाच्या ताडाख्याचा परिणाम शाळांच्या भौतिक सुविधांवर पडला असून देणगीतून निधी जमा करून उभारलेल्या सुसज्ज शाळांचे झालेले नुकसान पाहून नागरिक, पालक चिंता व्यक्त करीत आहेत.शाळांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष तसेच सोलार सिस्टीम यांचे नुकसान होऊन हीच रक्कम २ ते ४ लाखांच्या घरात जाते. त्यामुळे या नुकसानीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शिक्षणप्रेमी करीत आहेत. निसर्ग वादळाने शाळेच्या भौतिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगराळ असल्याने वीज आणि मोबाइल सेवा विस्कळीत झाल्याने त्यांचा जगाशी संपर्क तुटल्यामुळे अडचणींमध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळा