खालापूर : अडचणीत असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे मन लावून काम केल्याने अडचणीत असलेली एसटी आज चांगल्या परिस्थितीत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमीच असून एसटीही ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असून ग्रामीण जनतेशी जोडलेली एसटीची नाळ आजही कायम असल्याचा आनंद आहे. कर्मचारी चांगली सेवा देत असल्यानेच एसटीला पुन्हा सुगीचे दिवस आले असून कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत यापुढेही अशीच सुरू ठेवावी, असे आवाहन आ. सुरेश लाड यांनी केले आहे.खोपोली बस स्थानकातील आवाराचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. या कामाचे उद्घाटन आ. सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. खालापूर बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र काँक्र ीटीकरण झाल्याने हा त्रास कमी झाला असल्याचे लाड यांनी सांगितले. बस स्थानकाच्या अन्य इमारतींसाठी १५ लाख रुपयांचा निधी जाहीर करून बस स्थानकासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही आ. लाड यांनी यावेळी दिले.
चांगल्या सेवेमुळे एसटीला सुगीचे दिवस
By admin | Updated: November 7, 2015 00:24 IST