शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीवर दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
6
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
7
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
8
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
9
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
10
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
11
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
12
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
13
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
14
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
15
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
16
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
17
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
18
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
19
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
20
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू

जिंकलस भावा... सेरेब्रल पाल्सीग्रस्त ऋ षीकेश माळीचे नेत्रदीपक यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 06:48 IST

दिव्यांग प्रवर्गात प्रथम : शिक्षकांसह सर्व स्तरांतून कौतुक

अलिबाग : लहानपणी बोलता येत नव्हते, हात-पायात पीळ होता, डोळे तिरळे होते, धड बसताही येत नव्हते, अशी बहुविकलांगतेची लक्षणे असलेल्या सेरेब्रल पाल्सी या असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या म्हसळेतील न्यू इंग्लिश स्कूलचा ऋषीकेश सुदाम माळी या विद्यार्थ्याने दहावीत ५०० पैकी ४३३ गुण अर्थात ८६.६० टक्के गुण मिळवून दिव्यांग प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावला.

पाष्टी शाळेतील शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन, प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या सरावाबरोबरच आईवडिलांनी व्यायाम, फिजिओथेरेपी, योगासने, आहार व आरोग्य याची घेतलेली काळजी, सायकलिंग व नियमित चालणे, गायन इत्यादीवर मेहनत घेतल्याचे ऋषीकेश सांगतो.विज्ञानातील ‘स्टेम-सेल थेरेपी’ या आधुनिक उपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात अनुभव घेतला. उपचारानंतर मार्च महिन्यात थेरेपी व सततच्या बसण्यामुळे पाठदुखी बळावली. मात्र, तरीही बोर्डाकडून मंजूर असलेल्या लेखनिकाची मदत न घेता त्याने स्वत: पेपर लिहिले.अधिकारी बनण्याचे स्वप्न...

भविष्यात पुढील शिक्षण जिद्दीने पूर्ण करून ऋषीकेशला अधिकारी बनवून दिव्यांग व खासकरून सेरेब्रल पाल्सीग्रस्त पाल्य व पालक यांचे मनोबल उंचावण्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे त्याची आई शीतल माळी व वडील पी.एन.पी. शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड