शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

तीस हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 05:15 IST

खासगीकरणाचे पहिले पाऊल; केंद्र सरकारचे लेखी पत्रक जारी 

- मधूकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : केंद्र सरकारने बंदराच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल टाकले असून, देशातील ११ सरकारी बंदरांतील सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना (SVRS) लागू करण्यात आली आहे. यामध्ये जेएनपीटीच्या १,४७३ कामगारांचाही समावेश आहे. यासाठी केंद्र सरकारचे सचिव राजीव नयन यांनी १२ नोव्हेंबर, २०२० रोजी देशातील सरकारी ११ बंदरांसाठी लेखी पत्रच जारी केले आहे.

बंदरात कायमस्वरूपी १० वर्षे आणि ४० वर्षे वयोमर्यादेपासून काम करणारे कामगारच या योजनेसाठी पात्र ठरविले आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या कामगारांच्या वारसांना नोकरी देणे बंदरांना बंधनकारक नाही. विशेष स्वेच्छानिवृत्ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी आहे. त्यामुळे ती घेणाऱ्या कामगारांनी तीन महिने आधी नोटीस देणे बंधनकारक केले आहे. तसेच खासगी बंदरे अथवा कंपन्या वगळता एसव्हीआरएस घेणाऱ्या कामगारांना सरकारी बंदरात नोकरी मिळणार नाही. १० वर्षे, ३० वर्षांपर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत.या ऐच्छिक एसव्हीआरएसचा बंदरात ३० वर्षे काम केलेल्या कामगारांना अधिक आर्थिक फायदा होणार आहे. मात्र, ३० वर्षांहून कमी काम केलेल्या कामगारांसाठी एसव्हीआरएस आर्थिक नुकसानीची ठरणार असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.

देशातील ११ बंदरामधील कर्मचाऱ्यांचा समावेश देशभरात सरकारच्या अखत्यारित ११ बंदरे आहेत. या ११ बंदरातील कोलकाता- ३,७७२, पॅरादीप- ७५८, विशाखापट्टणम- ३,१५०, चेन्नई- ३ ९५३, व्ही.ओ. चिंदमबरन- ६९१, कोचीन- १,३९४, न्यू मंगलोर- ६०२, मोरमुगाव- १,५१३, मुंबई- ६,४३०, जेएनपीटी- १,४७३, दीनदयाळ- २,२०३ अशा ११ बंदरांत एकूण २५,९३९ कामगार काम करीत आहेत. देशभरातील या ११ बंदरांत काम करणाऱ्या सुमारे ३० हजार बंदर कामगारांसाठी केंद्र सरकारने विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीCentral Governmentकेंद्र सरकार