शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदारांसाठी केंद्रांवर विशेष वाहतूक व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:59 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा सज्ज

- जयंत धुळप अलिबाग : रायगड जिल्ह्यातील एकूण नऊ हजार ७०६ दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी आपल्या घरून निघून मतदान केंद्रावर येऊन मतदान करून पुन्हा आपल्या घरी पोहोचणे, या प्रवासादरम्यान तसेच मतदान करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, तसेच त्यांना मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा, याकरिता रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष कटाक्ष ठेवला आहे. त्यांच्या या भूमिकेस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या नियोजनाची पक्की साथ लाभली आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सर्व तालुक्यांत संपर्क अधिकारी नियुक्त करून दिव्यांग मतदार असणाºया मतदान केंद्रांवरील रॅम्प, व्हीलचेअर्स, शौचालय व्यवस्था, पाणीपुरवठा, एलईडी दिवे आदी मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून प्राप्त अहवालानंतर पुढील नियोजन केले आहे. दोन तालुक्यांना एक वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये सुधागड व खालापूरकरिता प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी, मुरुड व तळाकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, पेण व उरणकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, म्हसाळा व श्रीवर्धनकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अलिबागकरिता कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुुरकुटे, कर्जत व पनवेलकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, पोलादपूरकरिता के. वाय. बारदसकर, महाडकरिता कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, रोहाकरिता प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे आणि माणगाव तालुक्यांकरिता माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.१५ तालुक्यांत १५ विस्तार अधिकारीदिव्यांग मतदारांची ने-आण करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाºयांची नियुक्ती संबंधित प्रत्येक तालुक्याकरिता करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ८०७ ग्रामपंचायतींनी दिव्यांग मतदारांच्या मतदान सुविधेकरिता एकूण ६७८ नवीन व्हीलचेअर्स खरेदी करून उपलब्ध करून दिल्या आहेत. या व्हीलचेअर्सच्या माध्यामातून दिव्यांग मतदारांची ने-आण करण्याकरिता कर्मचारीही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक