शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नागोठणे रेल्वे स्थानकाला पुन्हा विशेष गाड्यांचा ठेंगा

By admin | Updated: August 22, 2015 21:43 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर

नागोठणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर थेट रोहे स्थानकावर थांबणार असल्याने पेण आणि नागोठणे यातून वगळल्याबद्दल प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संबंधित गाडीला नागोठणेत थांबा मिळण्यासाठी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. नागोठणे स्थानक मध्य रेल्वेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे गणले जाते. मालगाडीद्वारे दर महिन्याला लाखो टन मालाची चढ-उतार या स्थानकातून केली जात असल्याने रेल्वे प्रशासनाला त्यातून करोडो रु पयांचे उत्पन्न मिळत असते. या स्थानकातून दररोज पंचवीस ते तीस प्रवासी तसेच जलद गाड्या दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांकडे जात असल्या तरी यातील एकही गाडी स्थानकात थांबत नाही. रोहा-दिवा, दादर-रत्नागिरी, सावंतवाडी - दिवा, दिवा - रोहा, दिवा - सावंतवाडी आणि रत्नागिरी - दादर या आठच प्रवासी गाड्या येथे थांबत असल्याने परराज्यातून आलेल्या प्रवाशांना पनवेल, रोहे किंवा माणगाव या स्थानकात उतरून नागोठणेत यावे लागत असते. दर महिन्याला साधारणत: पंधराशे प्रवाशांना हा द्राविडी प्राणायाम करायची वेळ येत असते.नियमित नोकरीधंदा तसेच शिक्षणासाठी दररोज पनवेल, ठाणे, मुंबईकडे जाणारे पासधारक ही खंत बोलून दाखवत असले, तरी रेल्वेने पनवेल - चिपळूण गाडीला येथे थांबा न देता पुन्हा एकदा नागोठणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाली, खांब, आमडोशी, सांबरी, कोलेटी, रिलायन्स निवासी संकुल आदी भागातील अनेक गावांमधील शेकडो प्रवासी जा - ये करण्यासाठी नागोठणे स्थानकाचाच वापर करीत असतात. ही विशेष गाडी या स्थानकात थांबविली तर शेकडो प्रवाशांना त्याचा लाभ होणार असल्याने प्रवासीवर्गाचे म्हणणे आहे. (वार्ताहर)- १९८६ या मार्गावर वाहतूक चालू झाल्यानंतर एकतीस वर्षे उलटूनही नागोठणेतील प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असले, तरी आम्ही कितीही बोंबा मारूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. मात्र, कोणताही स्थानिक नेता आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करतात.